Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : सांगलीतील कारखान्यांचा हंगाम संपला

Sugarcane Harvesting : जिल्ह्यातील २०२३-२४ मधील ऊस गळीत हंगाम संपला असून, १७ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील २०२३-२४ मधील ऊस गळीत हंगाम संपला असून, १७ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप करून ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सरासरी उतारा ११.२३ टक्के आहे. यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांनी सीमा भागातील ऊस गाळपास आणला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात ५ लाख क्विंटलने वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील १९ साखर कारखाने आहेत. यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि ७ खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. आटपाडीतील माणगंगा आणि कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला नाही. उर्वरित १७ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला.

ऊस उत्पादकांचे आंदोलन आणि ऊस टंचाईवर मात करीत कारखान्यांनी गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केला. कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या बंद झाला आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ८७ लाख ११ हजार ४९८ टन उसाचे गाळप करून ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सर्वाधिक गाळप क्रांती कारखान्याने, तर सर्वांत कमी गाळप नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर अँड पॉवर कारखान्याने एक लाख ३७ हजार १३३ टन उसाचे केले.

जिल्ह्यात गत हंगामात ८२ लाख ३६ हजार टन उसाचे गाळप करत ९२ लाख ८३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि कर्नाटक सीमेवरील ऊस गाळपासाठी आणला. त्यामुळे यंदाच्या हंगामात ५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन वाढले आहे.

गळीत हंगामात

‘क्रांती’च अव्वल कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने या गळीत हंगामात विक्रमी १० लाख ६२ हजार ७६० टन उसाचे गाळप करून ११ लाख ४२ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ११.८८ टक्के राहिला आहे.

साखर उताऱ्यात राजारामबापू आघाडीवर

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने जिल्ह्यात सर्वाधिक १२.६२ टक्के साखर उतारा घेतला आहे. सर्वात कमी ८.५५ टक्के साखर उतारा एसजीझेड अँड एसजीए शुगर्स तासगाव कारखान्याचा आहे.

जिल्ह्यातील कारखानानिहाय गाळपाचे चित्र

कारखाना उसगाळप

(टनात) साखर उत्पादन

(क्विंटल) उतारा टक्के

दत्त इंडिया सांगली ७,९१,९५५ ८,९३,५७० ११.४१

राजारामबापू पाटील साखराळे ८,५२,६२९ १०,०९,८२० ११.८९

विश्वास नाईक चिखली ५,६९,३६७ ६,८६,७०० १२.१८

हुतात्मा किसन अहिर वाळवा ५,१५,५५० ६,४५,२२५ १२.३

राजारामबापू पाटील वाटेगाव ४,८२,३३४ .६,११,००० १२.६२

एस. जी. झेड तासगाव १,४२,१५४ १,१७,०५९ ८.५५

राजारामबापू पाटील जत १,८४,७२० २,०६,०३० १०.३१

सोनहिरा वांगी १०,४४,३६५ ११,५७,९७० १२.२

क्रांती कुंडल १०,६२,७६० ११,४२,६१० ११.८८

राजारामबापू पाटील कारंदवाडी ३,८९,१५० ४,८७,६७० १२.५१

मोहनराव शिंदे आरग २,५४,७८० २,७०,०७० १०.५८

निनाईदेवी(दालमिया) कोकरुड ५,२८,९१२ ६,४०,९३५ ११.९२

यशवंत शुगर नागेवाडी १,३७,१३३ १,५०,१७५ १०.७४

केन अॅग्रो डोंगराई २,३१,००० २,२४,०७० १०.२८

उदगिरी शुगर बामणी १,३७,१३३ १,५०,१७५ १०.७८

सद्गुरु श्री श्री राजेवाडी ६,००,९४६ ६,४३,१८५ ९.२९

श्रीपती शुगर डफळापूर ३००६७० ३२४८५० १०.७१

एकूण ८७,११,४०८ ९७,८३,२३९ ११.२३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT