Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : कोल्हापुरात ऊस हंगाम सुरू; पूर्व भागात दबकत तोडणी

Sugarcane Harvesting : दरवर्षी शेतकरी संघटनांचे उग्र आंदोलन यानंतर चर्चेच्या फेऱ्या, दरावर एकमत होऊन उसाचा हंगाम सुरू व्हायचा.

Team Agrowon

Kolhapur News : दरवर्षी शेतकरी संघटनांचे उग्र आंदोलन यानंतर चर्चेच्या फेऱ्या, दरावर एकमत होऊन उसाचा हंगाम सुरू व्हायचा. यावर्षी मात्र कोणत्याही चर्चेविना जिल्ह्यात ऊस हंगाम सुरू आहे. जिल्ह्यात १५ कारखान्यानी हंगाम सुरू केला आहे.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यात आंदोलन अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असून देखील कारखानदारांनी हंगाम सुरू केला आहे. आंदोलनाची धार काहीशी बोथट झाली असून प्रमुख मार्गावर ऊस अडवण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी देखील दबकतच ऊस तोडी घेत आहेत.

ऊसपट्टा अशी शिरोळ तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात सर्वाधिक ऊस उत्पादन होते. तालुक्यातील उसावर शिरोळ तालुक्यासह हातकणंगले, कागल, शाहूवाडीसह कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पुरवठा केला जातो.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या वतीने यंदा संयुक्त आंदोलन हाती घेण्यात आले आहे. यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपये, गतवर्षीच्या उसाला प्रतिटन दोनशे रुपयांच्या मागणीवरून तुरळक ठिकाणी आंदोलन सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमधूनच आंदोलनासाठी फारसा उत्साह दिसत नाही. दुसऱ्या बाजूला निवडणुकीआधी स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुश यांच्यात झालेल्या करारानुसार सुरुवातीला स्वाभिमानी आंदोलनापासून काहीशी अलिप्त होती.

गेल्या दोन दिवसांपासून संयुक्त बैठक घेऊन पुन्हा स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुश आंदोलनासाठी सक्रिय झाले असली तरी स्वाभिमानीचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने अद्याप आंदोलनात उतरले नसल्याने तालुक्यातील आंदोलनाची धार बोथट झाल्याचे दिसत आहे.

स्वाभिमानी पूर्ण क्षमतेने आंदोलनात सहभागी होत नसल्याने आंदोलनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कारखान्यांना ऊसपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशने ताकदीने आंदोलन रेटले तरच कारखानदारांकडून दरावर चर्चा होऊ शकेल अन्यथा सुरू झालेला हंगाम थांबवणे कठीण बनणार आहे.

शेतकऱ्यांची सावध भूमिका

उग्र नसले तरी तालुक्यात ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर फोडण्यात आल्याने शेतकरी सावध झाला आहे. तोडलेल्या उसाचे नुकसान नको यासाठी शेतकरी परिस्थितीचा अंदाज घेऊनच तोडी घेत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ ९९.२८ टक्क्यांवर

ISO Certification: महावितरणच्या सहा कार्यालयांना एका वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

Youth Empowerment: राज्यात ७५ हजार युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

SCROLL FOR NEXT