ॲग्रो विशेष

Sugarcane Management : आपत्कालीन परिस्थितीतील ऊस व्यवस्थापन

डॉ. एस. बी. पवार

Crop Management : पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ऊस पिकाला पाटपाणी पद्धतीने सिंचन करताना एक आड एक सरीतून द्यावे. पाण्याच्या ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली, तसेच वाळलेली पाने काढून घ्यावीत. ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत, त्यामुळ पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

- शक्यतो ठिबक अथवा तुषार सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्यात बचत होते.

- को-८६०३२, कोएम-०२६५, को-७४०, कोव्हीएसआय-९८०५ या जाती इतर जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या भागामध्ये नवीन लागवडीसाठी या जातीचाच विचार करावा.

- पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी (३० दिवसांनी) म्युरेट ऑफ पोटॅश दोन टक्के व युरिया दोन टक्के यांच्या मिश्रणाची (म्हणजेच प्रत्येकी २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.

- ऊस पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होईल.

- शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.

- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी सहा टन पाचटाचे आच्छादन करावे. त्यावर प्रतिटन पाचटासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सुपर फॉस्फेट व एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.

-लागवड करताना ऊस रोपांचा वापर करावा. त्यामुळे पाण्याची कमतरता भासली तरी रोपे तग धरून राहतील.

-खतांची शिफारशीत मात्रा देऊन २५ टक्के पालाश खत अधिक द्यावे. पालाश हे अन्नद्रव्य वनस्पतीच्या पर्णरंध्राची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनावर नियत्रंण ठेवले जाते. मुक्त प्रोलीनचे प्रमाण वाढवत असल्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते.

- लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी आणि दुसरी फवारणी तीन महिन्यांनी घ्यावी.

-सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. पीक आवर्षणास तोंड देऊ शकते.

-उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाण्याची प्रत्येक पाळी दोन-तीन दिवसांनी वाढवत न्यावी. त्यामुळे पिकाची पाण्याची ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढत जाते.

-उसाची लागवड करताना बेणे दोन तास चुनखडीच्या पूर्ण विद्राव्य स्वरूपातील द्रावणात बुडवून मगच लावावे.

पाण्याच्या ताणाचे परिणाम ः

- पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.

- मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते.

-पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्याची लांबी व उसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते.

-उसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशींचे प्रमाण वाढते.

-सुरू आणि खोडवा उसात फुटव्याचे प्रमाण कमी होते. तोडणीच्या वेळी गाळण्यालायक ऊस संख्येत घट झाल्याने उत्पादन घटते.

-पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्याची लांबी व जाडी कमी होते. उत्पादननात लक्षणीय घट होते. आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, कारण या काळात हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो.

हंगामनिहाय आपत्कालीन व्यवस्थान ः

सुरू हंगाम लागवड सर्वत्रच सुरू आहे. हे पीक तणविरहित ठेवावे. ज्या क्षेत्रात उसाची बांधणी झालेली नसेल, अशा ठिकाणी ऊस बांधणीच्या वेळेस पालाश खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी.

त्याच प्रमाणे राज्यात खोडव्याखाली ३५ ते ४० टक्के क्षेत्र आहे. खोडवा पिकामध्ये आधीच्या कापणीतील पाचट आच्छादन म्हणून वापरावे. खोडव्यास पहारीच्या साह्याने खतमात्रा देताना पालाशची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी.

या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया या मिश्रणाची (प्रत्येकी प्रमाण २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी. पीक तणविरहित ठेवावे. ज्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागवड केलेली आहे, अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

- डॉ. एस. बी. पवार, ९४२२१७८९८२

(सहयोगी संचालक संशोधन आणि विस्तार कृषी विद्यावेत्ता, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छ. संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT