Sugarcane Production Agrowon
ॲग्रो विशेष

ऊस हे आळशी लोकांचे नव्हे,तर कष्टकऱ्यांचे पीकः अजित पवार

शेतकऱ्यांनी ऊस पिकाबरोबरच इतर पिकांनाही प्राधान्य दिले पाहिजे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ऊस पिकाचा मोठा अभ्यास आहे. अलीकडच्या काळात साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीला संबंधित नेत्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

कल्याण पाचांगणे ः सकाळ वृत्तसेवा

माळेगाव, ता. बारामती : ‘‘गतवर्षी समाधानकारक झालेले पर्जन्यमान, उत्तम ऊस बेणे निवड, पाणी आणि खत मात्राचे व्यवस्थापन आदींमुळे माळेगाव, सोमेश्‍वर, छत्रपतीसह सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सरासरी उसाचे एकरी उत्पादन यंदा वाढले. राज्यात एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन काढण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहेत. ते शेतकरी शिवारात प्रचंड कष्ट करतात. त्यामुळे हे पीक आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे आहे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाने सुरू केलेल्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियानाचा प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘कृषी विभागाचे उसाचे क्षेत्र नव्हे, तर एकरी उत्पादन शंभर टनापर्यंत वाढविण्याचे अभियान निश्‍चित फायद्याचे ठरेल. पवारसाहेब आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचा ऊस पिकाचा मोठा अभ्यास आहे. अलीकडच्या काळात साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीला संबंधित नेत्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनीही ऊस पिकाबरोबर आता शेतकऱ्यांनी इतर पिकांनाही प्राधान्य देण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. हे जरी खरे असले, तरी शेतकरी शाश्‍वत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून उसाला प्राधान्य देतात. त्यानुसार कृषी विभागाने एकरी उत्पादन शंभर टनांपर्यंत वाढविण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे.

दरम्यान, पवार यांनी बारामती परिसरातील चाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी शासनस्तरावर दीड कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्‍वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (पुणे) ज्ञानेश्‍वर बोटे आदी उपस्थित होते.

बारामती तालुक्यातील भौगोलिक स्थितीचा विचार करून माळेगावचे उसाचे कार्यक्षेत्र वाढविले जाईल. तशापद्धतीच्या सूचना साखर आयुक्तांना दिल्या जातील. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ‘माळेगाव’च्या प्रशासनाने सभासद करून घ्यावे, असा धोरणात्मक निर्णय पवार यांनी जाहीर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Procurement: भाताच्या सरकारी खरेदीला वेग, साठा १२ टक्क्यांनी वाढला, अधिक निर्यातीची संधी

Boat Manufacturing Industry: लाकडाच्या बोटी कालबाह्य

Siddheshwar Agriculture Exhibition: सोलापुरात २५ डिसेंबरपासून ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’

CM Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून शेतरस्त्यांना राजाश्रय

Mahavistar App: महाविस्तार ॲप वापरण्यात अकोले खुर्द राज्यात टॉप

SCROLL FOR NEXT