Radhanagari Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Radhanagari Rain : राधानगरी तालुक्यात पावसाची हुलकावणी, बळिराजाला पावसाची प्रतिक्षा

Drought Conditions in Kolhapur : सध्या धामणी नदीच्या काठावरील तीन तालुक्यांतील २३ गावांना पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य भेडसावत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वळवाचा जोरदार पाऊस होत आहे परंतु काही तालुक्यातील अनेक भागात अद्याप एकही वळीव झाला नाही. यंदा धरणात पाणी कमी असल्याने उपसाबंदी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी माळरान शेती असल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात वळीव पाऊस हुलकावणी देत आहे. पंधरा दिवसांपूर्वी धामणी नदी कोरडीठाक पडली असताना येथील बळिराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मात्र, या परिसरात वातावरण वळीव पावसाला पोषक बनते, परंतु वाऱ्याच्या प्रवाहामुळे पाऊस हुलकावणी देत आहे. धामणी नदी कोरडीठाक आणि वळवाची हुलकावणी अशा चक्रव्यूहात येथील ऊस पीक वाळू लागले आहे.

सध्या धामणी नदीच्या काठावरील तीन तालुक्यांतील २३ गावांना पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य भेडसावत आहे. नदी कोरडी पडल्याने स्वखर्चातून उभारलेले मातीचे बंधारे शेतकऱ्यांनी काढले आहेत. परिसरात सध्या उसाचे पीक समाधानकारक असून, हिरवेगार उसाचे मळे डोलत आहेत. वर्षभर येथील शेतकऱ्यांनी ऊस पीक घेण्यासाठी धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाण्याच्या नियोजनासाठी उपसा बंदीचे वेळापत्रक तयार केले.

धामणी प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्याला पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पाण्याचा शेतीसाठी वापर केला. वर्षभर कष्ट करून येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, परंतु पाण्याअभावी वाळू लागला आहे. उसासाठी शेतकऱ्याला मोठ्या वळवाची नितांत गरज आहे.

गेल्या आठवड्यापासून परिसरात वळवाला पोषक वातावरण तयार होते. मात्र, वळीव हलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पाण्याअभावी धामणी परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील ऊस पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठ्या वळवाच्या प्रतीक्षेत आहे.

यावर्षी ऊस पीक अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. धामणी नदीवर स्वखर्चातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे वळवाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सयाजी पाटील, शेतकरी, असंडोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT