Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : नंदुरबारात ऊस लागवड स्थिर

Sugarcane Season : खानदेशात ऊस गाळपात आघाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ऊस लागवड स्थिर आहे.

Team Agrowon

Nandurbar News : खानदेशात ऊस गाळपात आघाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ऊस लागवड स्थिर आहे. शहादा तालुक्यात ऊस लागवडीस अधिकची पसंती मिळाली आहे. अनेकांनी पपई, कापूस पिकांखालील क्षेत्र कमी करून किंवा क्षेत्र टाळून उसाची लागवड केली आहे.

तळोदा, शहादा तालुक्यांत पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड बऱ्यापैकी केली आहे. दलते निसर्गचक्र तसेच उत्पादित मालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल, मजूरटंचाई या समस्या पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे.

मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या साह्याने बागायती शेती केली जाते. त्याचबरोबर केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.

परिणामी, उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळत आहेत. परिसरात दुर्गा खांडसरी, पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर तसेच समशेरपूर येथील आयान मल्टी ट्रेड एलएलपी आदी कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जातो.

पैकी यंदा पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगरचा गळीप हंगाम सध्या तरी बंद आहे. गेल्या वर्षी ऊस उत्पादकांचे देणे थकल्याने सद्यःस्थितीत कारखाना बंद आहे. उर्वरित दोन्ही कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जात आहे.

सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. पट्टा पद्धतीने लागवड करणे व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे. जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. सर्वाधिक लागवड शहादा तालुक्यात केली जाते.

उसालाही दर कमीच

राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसा दर मिळत नसल्याने ऊसदराविषयी शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. परंतु इतर पिकांना लागणारा खर्च, त्यासोबतच करावी लागणारी मेहनत पाहता त्यामानाने ऊस नैसर्गिक संकटातही तग धरून राहतो म्हणून बहुतांश शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत.

जिल्ह्यातील कारखानदारांकडून उसाला कमी दर दिला जात असला, तरी मजूरटंचाई, बदलते निसर्गचक्र पाहता उसाचा उत्पादनातून हाताला दोन पैसे कमी मिळतील; परंतु हमीचे उत्पादन मिळते म्हणून ऊस लागवडीला पसंती देत आहोत.
-सुरेश पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, शहादा (जि.नंदुरबार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT