Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

Team Agrowon

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील साखर कारखान्यांचा (Sugar factory) गाळप हंगाम सध्या आटोपतीकडे चालला आहे.

विभागातील तीन कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी ९७ लाख १३ हजार १९ टन उसाचे गाळप, तर ९७ लाख ४४ हजार ७० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

यात २० खासगी, तर ११ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. यंदा हंगामाची सुरुवात ता. २२ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर ऍण्ड अलाइड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली.

आजपर्यंत विभागातील २९ कारखाने सुरू झाले आहेत. यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी, तसेच लातूर जिल्ह्यातील पाच सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश आहे.

विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे चालला आहे. नांदेड विभागातील तीन कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील एक, लातूरमधील एक तर हिंगोलीतील एका कारखान्याचा समावेश आहे.

आजपर्यंत या कारखान्यांनी ९७ लाख १३ हजार १९ टन उसाचे गाळप, तर ९७ लाख ४४ हजार ७० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९४ टक्के असल्याची माहिती मिळाली.

गंगाखेड शुगर अखेरपर्यंत आघडीवर

नांदेड विभागातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि. हा खासगी साखर कारखाना यंदा ता. ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. या कारखान्याने गाळपात विभागामध्ये आघाडी घेतली आहे. ती शेवटपर्यंत कायम ठेवली आहे.

या कारखान्याने आजपर्यंत सहा लाख ९८ हजार ४२० टन उसाचे गाळप तर सहा लाख ९३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

कारखानिहाय ऊसगाळप व साखर उत्पादन

(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा - कारखाने- ऊसगाळप - साखर उत्पादन

नांदेड सहा १७,४३,२५६ १७,३९,१२५

लातूर ११ ३७,९७,८७२ ३७,९६,५३०

परभणी सात २६,८४,४४५ २६,५८,८३५

हिंगोली पाच १४,८७,४४६ १५,४९,५८०

एकूण २९ ९७,१३,०१९ ९७,४४,०७०

विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.९४ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT