Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Season : राज्यातील ऊस गाळप हंगाम आटोपला; साखरेचं उत्पादन घटलं

sugarcane crushing : राज्यातील ऊस गाळप हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास आटोपला आहे. यंदाच्या हंगामात २०० कारखान्यांपैकी १९९ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या हंगामात राज्यात केवळ ८०७.६१ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे.

Dhananjay Sanap

Maharashtra sugar industry : राज्यात पाणी टंचाई आणि वाढती उष्णतामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन घटलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २६.६ टक्क्यांनी साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम निराशाजनक ठरला आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास आटोपला आहे. यंदाच्या हंगामात २०० कारखान्यांपैकी १९९ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या हंगामात राज्यात केवळ ८०७.६१ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे. त्यामुळे साखर उत्पादनात २६.६ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत दरम्यान ११००.९३ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं होतं.

तसेच साखरेच्या उताऱ्यात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा उतारा १.०२५ क्विंटल होता. यंदा मात्र ०.९४७ क्विंटलवर घसरला आहे. मॉन्सून हंगामात पावसाने साथ दिली. परंतु हवामानातील तीव्र बदलाने ऊस पिकावर परिणाम झाल्याचं जाणकार सांगतात.

देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु साखर निर्यात आणि इथेनॉल निर्मितीवरील बंधन यासारख्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर उष्णतेचा कहर वाढल्याने पाणी टंचाईही काही भागात जाणवली.

राज्यातील ऊसाची एकरी उत्पादकता ७० ते ७२ टनांवर आली आहे. तर साखर उताऱ्यातही घट झाली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन कारखानदारांकडून केलं जात आहे. परंतु हवामान बदलाचं संकट आणि सरकारची धोरण धरसोडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

मागील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं राजकारण तापल्याने शेतकऱ्यांना वाढीव बिलं देण्यात आली. परंतु यंदा मात्र उतारा घटल्याचं कारण देत बहुतांश शेतकऱ्यांना एफआपीपेक्षा कमी बिलं मिळाली. त्यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली.

दरम्यान, राज्यातील साखर उत्पादनातील घटीमुळे सरकारलाही त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. त्यामुळे हवामान बदल अनुकूल धोरण निर्मितीसह शेतकरी हिताची धोरणं राबवणं गरजेचं असल्याचं मत अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT