Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : अहिल्यानगर विभागात तेवीस लाख टन ऊसगाळप

Sugarcane Crushing : अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत २४ साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत २४ साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत २३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७.४६ टक्के तर नाशिक जिल्ह्यात सरासरी ६.८१ टक्के साखर उतारा आहे.

अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात वीस व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे. अहिल्यागरला ९४ हजार ७५० टन तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात १ लाख ५ हजार ५०० टन गाळप क्षमता आहे.

सध्या विभागात एक लाख टनांपर्यत गाळप होत असून ८० हजार क्विंटलच्या जळपास साखर उत्पादन होतेय. आतापर्यंत विभागात २३ लाख टनाच्या जवळपास गाळप झाले असून १६ लाख ८० हजार क्विंटलच्या जवळपास साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताराही तसा कमीच आहे.

अहिल्यानगरचा सरासरी साखर उतारा ७.५९ तर नाशिकमध्ये ६.८१ टक्के साखर उतारा आहे. अहिल्यानगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या अहवालानुसार सर्वाधिक ‘क्रांती शुगर’चा १०.०४ साखर उतारा असून सध्या तरी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचा ५.५५ सर्वांत कमी साखर उतारा आहे.

आतापर्यंत खासगी असलेल्या इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखान्याने सर्वाधिक सव्वा तीन लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले आहे. ऊसगााळपात सहकारी सााखर कारखान्यात मारुतराव घुले कारखाना पुढे आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोन लाखांच्या जवळपास उसाचे गाळप झाले आहे.

दराबाबत गुळणी कायम

अहिल्यानगर विभागात उसाचे गाळप जोरात सुरू आहेत. मात्र अद्याप एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नाही. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही याबाबत गप्प आहेत. बहुतांश कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. आता विधानसभा निवडणुकीचा माहोल संपला, गाळप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला मात्र दराबाबत साखर कारखानदारांची गुळणी कायम आहे.

कारखानानिहाय उसाचे गाळप (टन)

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) ः ९३,१७४, कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव) ः १,१४,३४६, गणेश सहकारी (राहाता) ः २७,८५०, अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः ९०,५१०, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (राहाता) १,०६,८५, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः ८९,५५०, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः १,७७,५७०, लोकनेते मारुतराव घुले (नेवासा) २,००,९६०, वृद्धेश्वर (पाथर्डी) ः ३२४६५, मुळा सहकारी (नेवासा) ः ८६,०४०, अगस्ती (अकोले) ः ५८,८६४, क्रांती शुगर (पारनेर) ः ७६,७६५, अंबालिका (कर्जत) ः ३,२५,२८०, गंगामाई (शेवगाव) ः २,०७,७५०, गौरी शुगर (श्रीगोंदा) ः १,५८,४९०, प्रसाद शुगर (राहुरी) ः ८६,२५०, बारामती अॅग्रो (हळगाव, जामखेड) ः ५४,१६०, सोपानराव ढसाळ (माळकुप, पारनेर) ः १७,०२५, कादवा (दिंडोरी, नाशिक) ः ६३,५५०, अष्टलक्ष्मी (पळसे, नाशिक) ः २३,९५०, एस. जे. शुगर (रावळगाव, मालेगाव) ः ५३३०, द्वारकाधीश (शेवरे, सटाणा) ः ६६०९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT