Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप वेगात

Sugarcane Season : खानदेशात ऊस गाळप वेगात सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १९ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, यंदाचे गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस गाळप वेगात सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १९ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, यंदाचे गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. ऊस गाळपात नंदुरबारने आघाडी घेतली आहे. नंदुरबारातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने प्रतिदिन साडेनऊ हजार टन ऊस गाळप केले आहे. नंदुरबारात तीन साखर कारखाने सुरू आहेत.

धुळ्यात एक लहान कारखाना सुरू असून, तेथे रोज ६०० ते ७०० टन उसाचे गाळप केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातही दोनच कारखाने सुरू आहेत. त्यात दोन्ही कारखाने खासगी व्यवस्थापनाचे असून, सर्वाधिक गाळप मुक्ताईनगर येथील कारखान्याने जळगाव जिल्ह्यात केले आहे. नंदुरबारातील पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील कारखाना व जळगाव जिल्ह्यातील न्हावी (ता. यावल) आणि भोरस (ता. चाळीसगाव) येथील कारखाना बंद आहेत.

जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखान्यानेदेखील गाळप वेगात केले आहे. यंदाचे गाळप लवकर पूर्ण होईल, असे दिसत आहे. काही कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस अधिकचा आहे. कारण बंद कारखान्यांमुळे त्यांची तोडणी रखडत सुरू होती. नंदुरबारातील कारखान्यांनी १० लाख टनांवर उसाचे गाळप केल्याची माहिती आहे.

नंदुरबारात डोकारे (ता. नवापूर) व तळोदा येथे श्रीकृष्ण कारखान्यानेही बऱ्यापैकी ऊस गाळप केले आहे. यंदा नंदुरबारात नोव्हेंबरमध्ये अतिपाऊस झाल्याने गाळप किवा ऊस तोडणी रखडली. शहादा व इतर भागात अतिवृष्टी झाली होती. यामुळे तोडणी १५ ते १६ दिवस अनेक भागात सुरू होऊ शकली नाही. पुढील महिन्यात ऊस तोडणी काही कारखान्यांच्या क्षेत्रात पूर्ण होईल.

अन्य भागांतूनही वाहतूक

खानदेशात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नगर जिल्ह्यातील कारखानेदेखील उसतोडणी करीत आहेत. धुळ्यातील साकी, जळगावमधील चाळीसगाव, चोपडा भागात अन्य जिल्ह्यांतील कारखान्यांनी ऊस तोडणी केली आहे. अन्य कारखान्यांनीदेखील ऊस तोडणी सुरू केल्याने गाळप यंदा लवकर पूर्ण होईल, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

Water Management: धरणनिहाय पाणीसाठ्याचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी

Karnataka Drought Relief: कर्नाटकातील ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, प्रत्येकी २,५०० रुपयांचे कृषी निविष्ठा अनुदान जाहीर

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT