VSI Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील

Sugarcane Crisis : देशाच्या कृषी विकासात ऊस पीक मोलाची भूमिका बजावते आहे. मात्र जमिनीची सुपीकता खालावल्याने सरासरी ऊस उत्पादन व साखर उताराही घटतो आहे.

मनोज कापडे

Pune News : देशाच्या कृषी विकासात ऊस पीक मोलाची भूमिका बजावते आहे. मात्र जमिनीची सुपीकता खालावल्याने सरासरी ऊस उत्पादन व साखर उताराही घटतो आहे. त्यामुळे ऊस शेतीकरिता आता एकात्मिक प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एल. पाटील यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) मांजरी बुद्रुक येथे मुख्यालयात बुधवारी (ता. ३०) आयोजिलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्‍घाटन करताना डॉ. पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऊस संशोधन संस्थेचे माजी संचालक व कुलगुरू डॉ. एस. सोलोमन, व्हीएसआयच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. इंद्रजित मोहिते, सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडूपाटील, व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘साखर उद्योगावर लाखो शेतकरी व कामगार अवलंबून आहेत. मात्र पाणी व खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे ऊस शेतीमधील अडचणी वाढल्या आहेत.

त्या दूर करण्यासाठी संशोधन संस्था, साखर उद्योग व शेतकऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील.’’ हवामान बदलामुळे देशाचे ऊस उत्पादन भविष्यात आणखी घटू शकते, असा इशारा कुलगुरू डॉ. सोलोमन यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing : ‘उच्चशिक्षित येवलेंचा नियोजनबद्ध यशस्वी प्रक्रिया उद्योग

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT