Jowar Threshing  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Threshing : दादर ज्वारी पीक मळणी पूर्ण

Jowar Harvesting : खानदेशात दादर ज्वारीचे पीक जोमात होते. काही भाग वगळता पिकात मळणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीचे पीक जोमात होते. काही भाग वगळता पिकात मळणी पूर्ण झाली आहे. पीक बऱ्यापैकी होते. मळणी करून शेतकऱ्यांनी ज्वारीचा साठा घरात केला आहे. खानदेशात यंदा दादर ज्वारी व संकरित ज्वारीची मका पिकापेक्षा कमी पेरणी झाली होती. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी चांगल्या पावसामुळे काहीशी वाढली.

संकरित ज्वारी, संकरित दादर ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली. चारा व दादर ज्वारीचे दर मागील हंगामात कमी होते. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मका, कांद्याची लागवडही केली आहे. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी, संकरित ज्वारी व संशोधित दादर ज्वारी वाणांची पेरणी झाली आहे.

तर मक्याची लागवड सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे. मागील तीन वर्षे मका लागवड वाढत आहे. २०२१ मध्ये खानदेशात मक्याची लागवड सुमारे ४२ हजार हेक्टरवर झाली होती. लष्करी अळीची समस्या शेतकरी फवारणी घेवून रोखतात. यामुळे मका लागवड वाढली.

कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी खानदेशात जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर या भागांत अधिक होती. तसेच नंदुरबारातील शहादा व धुळ्यातील शिरपूर तालुक्यांतही दादर ज्वारी पीक होते.

आगाप पेरणीच्या पिकात मळणी मागील आठवड्यातच पूर्ण झाली. दिवाळीनंतर पेरणी केलेल्या कोरडवाहू दादर ज्वारीचे पीक मळणी होऊन पीक घरात आले आहे.

संकरित ज्वारीही होतेय पक्व

विविध कंपन्यांच्या संकरित ज्वारीची पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आहे. संकरित ज्वारी पीकही जोमात आहे. तीदेखील मळणीवर आली आहे. कारण कणसे पक्व होत आहेत. काही शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून संशोधित दादर ज्वारी वाणांची पेरणी केली आहे.

काळ्या कसदार जमिनीसह मध्यम जमिनीतही पीक जोमात होते. खानदेशात दादर ज्वारीची पेरणी उशिरादेखील झाली होती. उशिरा पेरणीच्या ज्वारीतही कणसे पक्व होत आहेत. परंतु या पिकात कापणी, मळणीचे काम सध्या बंद आहे. पावसाळी वातावरण निवळल्यानंतर कापणी, मळणीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT