Tractor Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Tractor Subsidy Scheme: राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

Roshan Talape

थोडक्यात माहिती...

  • राज्य सरकारकडून ट्रॅक्टरसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान

  • अल्पभूधारक, महिला व अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना विशेष लाभ

  • एकाचवेळी फक्त एका यंत्रासाठीच अनुदान मिळणार

  • १० वर्षांपूर्वी अनुदान घेतल्यास ट्रॅक्टरसाठी अर्ज करता येणार नाही

  • अर्जासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध

Pune News : राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असते. मात्र या योजनेमुळे त्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळते. त्यामुळे शेतातील कामाचा वेग वाढण्यास मदत होते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, त्याद्वारे शेतीतील उत्पादनात वाढ करणे आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणे हा आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश

  • शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढवणे.

  • शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे.

  • शेतकऱ्यांचा शारीरिक ताण कमी करणे.

  • शेतीच्या कामातील वेळ आणि मेहनत वाचवणे.

  • शेतकऱ्यांचा आर्थिक ताण हलका करणे.

  • कमी जमिनीवर अधिक उत्पादन घेण्यास मदत करणे.

कसे असेल अनुदान?

  • महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना ५०% अनुदान

ट्रॅक्टरसाठी अनुदान मर्यादा: १ लाख २५ हजार

  • इतर सर्व शेतकऱ्यांसाठी ४०% अनुदान

ट्रॅक्टरसाठी अनुदान मर्यादा: १ लाख रुपये

योजनेच्या लाभासाठी नियम

  • या योजनेत एका वेळी शेतकऱ्याला फक्त एका यंत्रासाठी अनुदान मिळते.

  • जर शेतकऱ्याने पूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतले असेल, तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी तो अर्ज करू शकत नाही.

  • मात्र शेतकरी इतर नवीन यंत्रांसाठी अर्ज करू शकतो.

  • जर कुटुंबातील कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असेल, तर त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या अवजारांसाठीही शेतकऱ्याला अनुदान मिळू शकते.

  • त्यासाठी फक्त ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा द्यावा आणि योजनेचा लाभ घेता येतो.

अर्ज कसा करावा?

  • ऑनलाईन अर्जासाठी लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in

  • अथवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करता येतो.

  • तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन आवश्यक माहिती घेऊन मार्गदर्शनाखाली अर्ज सादर करावा असे आवाहन कृषी विभागातर्फे केले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. ट्रॅक्टरसाठी किती अनुदान मिळते?
महिला, SC/ST शेतकऱ्यांना ₹१.२५ लाख आणि इतर शेतकऱ्यांना ₹१ लाख अनुदान मिळते.

२. अर्ज कोण करू शकतो?
लहान व अल्पभूधारक शेतकरी, महिला, SC/ST शेतकरी अर्ज करू शकतात.

३. ट्रॅक्टर ऐवजी दुसऱ्या यंत्रासाठीही अनुदान मिळते का?
होय, पण एकावेळी फक्त एकच यंत्रासाठी अनुदान मिळते.

४. अर्ज कुठे व कसा करायचा?
https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर ऑनलाइन किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.

५. जर पूर्वी अनुदान घेतले असेल तर?
ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतले असल्यास १० वर्षे दुसऱ्यांदा अर्ज करता येणार नाही, पण इतर यंत्रांसाठी करता येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT