Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone Subsidy : शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान

Agriculture Drone Scheme : शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Mumbai News : शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तळा कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शासनाकडून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन देण्यात येत आहे. त्‍यातच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत होत आहे. त्‍याअनुषंगाने ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत; मात्र ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर अगोदर त्यासंबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे.

शासनाकडून ट्रेनिंग मिळणार

शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोनफवारणी करतेवेळी कशा प्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तसेच औषधफवारणी करतेवेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण दिले जाईल.

ड्रोनचा फायदा काय?

ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो.

पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते.

ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील कीड, रोगांची माहिती ठेवता येते.

किती अनुदान मिळणार?

विद्यापीठे व सरकारी संस्था- १०० टक्के अनुदान (१० लाखांपर्यंत)

शेतकरी उत्पादक संस्था- ७५ टक्के अनुदान (७ लाख ५०,००० रुपये)

कृषी पदवीधारकासाठी- ५ लाखांपर्यंत अनुदान

इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख अनुदान.

योजनेसाठी कोणाला संपर्क साधावा?

संबंधित कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून योजनेबद्दलची अधिक माहिती मिळवू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT