Buffalo Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Buffalo Milk Subsidy : म्हैस दुधासही अनुदान द्या, गोकुळ अध्यक्षांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

Milk Subsidy : कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान व तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारने गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh Kolhapur : कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राज्यस्थान व तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारने गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन ‘गोकुळ’ चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल (ता.११) दिले.

राज्य शासनाकडून ठराविक काळासाठी गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि विशेषत कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूध हे चांगले, सकस, पोषक आणि दर्जेदार असून पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये या म्हैस दुधाला जास्त मागणी आहे.

मात्र, अपेक्षित दराअभावी दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. यावर उपाय म्हणून गाय दूध खरेदीसाठी सध्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. परंतु, फक्त गाय दुधालाच अनुदान जाहीर केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी गाय पालनाकडे आकर्षित होत असल्याचे दिसते. परिणामी म्हैस दूध उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

म्हैस दूध उत्पादकामध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या दुधाला अनुदान दिल्यास सहकारी संस्थांना बळकटी देण्याबरोबरच म्हैस दूध उत्पादकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Wheat Crop: पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला, गव्हाचं बंपर उत्पादन शक्य

Maharashtra Weather Update: थंडी वाढीला पोषक वातावरण; राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट

Flower Exhibition: पुष्प प्रदर्शनातून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Harnabari Project: हरणबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी आवर्तनास सुरुवात

PESA Act funds: पेसा निधी वितरणासाठी जिल्हा परिषदेची ऑनलाइन प्रणाली

SCROLL FOR NEXT