Textile Pak  Agrowon
ॲग्रो विशेष

Textile Park : टेक्स्टाइल पार्कचा प्रस्ताव द्या, मंजुरी मिळवून देऊ

Textile Industry : सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्योगामध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. चादरी, टॉवेल व स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापूर होत आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्योगामध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. चादरी, टॉवेल व स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापूर होत आहे. परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करा.

यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेऊ, असा विश्‍वास परिवहन व बंदरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या सर्व शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले तेली, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.

पालक सचिव श्री. सेठी म्हणाले, वस्त्रोद्योगात सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नाव आहे व येथे पोषक वातावरण तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सोलापूर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा.

टेक्स्टाईल पार्क निर्माण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर असून केळी निर्यातीत ही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात डाळिंब व केळी पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासन स्तरावरून करण्यात येईल.

पालक सचिव संजय शेठी यांनी शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर होडगी रोड येथील सोलापूर विमानतळाला भेट देऊन विमानतळाची पाहणी केली व कामकाजाची माहिती घेतली. तसेच विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बंजारा व श्रीमती अंजनी यांच्याकडून जाणून घेतल्या. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार हेही उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाला सूचना

शंभर दिवसात सात सूत्री कार्यक्रम राबवा, सातत्य ठेवा

चिंचोली एमआयडीसी, अक्कलकोटरोड एमआयडीसीमध्ये उद्योगांना पूरक सुविधा द्या

विमानसेवेसाठी अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन मार्ग काढला जाईल

एप्रिल २०१९ पूर्वीच्या शासकीय वाहनांना हवी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

सर्व खासगी वाहनांनाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT