Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेचे प्रस्ताव सादर करा

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी राबवली जात आहे.

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी राबवली जात आहे. आंबिया बहारामध्ये आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आणि संत्रा अशा सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

या योजनेला १२ जून २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, जास्त पाऊस, वेगाचा वारा, दैनंदिन कमी तापमान व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देणे व पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. कृषी सहायकांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असेही श्री. ढगे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२४

मोसंबी ३१ ऑक्टोबर २०२४

केळी ३१ ऑक्टोबर २०२४

डाळिंब १४ जानेवारी २०२५

द्राक्ष १५ ऑक्टोबर २०२४

आंबा ३१ डिसेंबर २०२४

योजनेची वैशिष्ट्ये...

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे (कुळाने, भाड्याने पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

सन २०२४-२५ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्क्यांवरील विमा हफ्ता राज्यशासन व शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.

या योजनेअंतर्गत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांना ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी कमीत कमी ०.२० हेक्टर व जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल.

अधिसूचित फळपिकापैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. उदाहरणार्थ (संत्रा मोसंबी व डाळिंब)

केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.

फळपीकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील

फळपिक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.

बँकेकडून अधिसूचित फळ पिकासाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांनी वेळेत प्रस्ताव सादर करून या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

Elephant Rampage : जंगली हत्तींचा शेतशिवारात धुमाकूळ

Sugarcane Harvester : चांगतपुरी गावची पंजाब आणि हरियानाशी स्पर्धा

SCROLL FOR NEXT