Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदा संयुक्त पीक पाहणी अहवाल सादर करा : तरटे

Kanda Bajar bhav : एक फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये कांदा अनुदान शासन देणार आहे.

Team Agrowon

Onion Market Nagar News : ‘‘एक फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये कांदा अनुदान शासन देणार आहे. त्यासाठी पारनेर बाजार समितीमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर खरीप हंगामाच्या हस्तलिखित नोंदी आहेत.

काही शेतकऱ्याच्या रब्बी, उन्हाळ हंगामातील नोंदी आहेत. अनुदानासाठी त्रिस्तरीय समितीचा पीक पाणी अहवाल गरजेचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित अहवाल द्यावा,’’ असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे यांनी केले.

कांदा अनुदानासाठी २०२२-२३ या सालाची लेट खरीप कांदा पिकाची पीक नोंद असणे आवश्यक आहे. फक्त ई-पीक पाहणी केलेले शेतकरी त्यासाठी पात्र असतील. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रीसदसीय समिती गठित केली आहे.

या समितीने कांदा उत्पादकांची खरीप कांदा पीक लागवडीची खात्री करून तसा स्पष्ट अहवाल सादर करावयाचा आहे. त्याचा विहित नमुन्यातील अर्ज बाजार समितीकडे उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी या अर्जावर स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचा संयुक्त पाहणी अहवाल, गट नंबर, खाते नंबर खरीप हंगाम कांदा पिकाचे क्षेत्र नमूद करून संयुक्त स्वाक्षरीने बाजार समितीकडे सादर करावा. सोबत कांदा अनुदान अर्ज केल्याची पोहच पावती, बँकेचे नाव व अर्जाचा नंबर नमुद करणे आवश्यक आहे.

‘कांदा बाजार समितीमध्येच विक्री करा’

‘‘कांदा उत्पादकांनी कांदा बाजार समितीमध्ये विक्री करावा. खासगी व्यापारी अथवा शेतावर विक्री करू नये. कारण खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांदा उत्पादकांनाच कांदा अनुदानाचा फायदा होईल,’’ असे तरटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय'; सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान

Coconut Farming : कल्पवृक्ष गोव्यासाठी...

World Egg Day: कोंबडीचे अंडे : आरोग्यासाठी परिपूर्ण खजिना

Ativrushti Madat GR : अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यांची यादी राज्य सरकारने केली प्रसिद्ध; नांदेड जिल्हा वगळला

Agriculture Value Chain: कृषिमूल्य साखळीतून पर्यायी बाजारव्यवस्था

SCROLL FOR NEXT