MLA Subhash Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Conservation : वृक्षसंवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी

Team Agrowon

Solapur News : पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपल्याला जगण्यासाठी चांगल्या हवामानाची गरज असते. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी, वृक्षांमुळे आपल्याला दुष्काळावरही मात करता येईल, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले.

पर्यावण दिनानिमित्त सोलापुरातील सिद्धेश्वर वनविहारमध्ये वन विभाग व चव्हाण मोटर्स व संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देशमुख बोलत होते. आमदार देशमुख म्हणाले, की सिद्धेश्वर वनविहार हे मुंबईनंतर शहराभोवती आरक्षित वनक्षेत्र असलेले राज्यातील दुसरे वनविहार आहे.

६५० एकर क्षेत्रावर पसरलेल्या या वनविहाराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सहा किलोमीटर फॉरेस्ट वॉक ट्रॅक, ओपन जीम, पक्षी निरीक्षण टॉवर, विश्रांतीसाठी पॅगोडा, झोपड्या अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्वसोयींनी युक्त असे हे स्थळ आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.

या वेळी त्यांनी वनविहारात फिरून कामाची पाहणीही केली. शासनाने सिद्धेश्वर वनविहारसाठी मोठा निधी मंजूर केला असून आगामी काळात नागरिकांना येथे सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत, असेही ते म्हणाले. उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहायक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. खलाणे, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना पदाधिकारी, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

वाढदिवस करा वृक्षारोपणाने : राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूर जिल्ह्यात वृक्षलागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येईल. निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे. वृक्ष लागवड व संगोपन करून आपण त्याची परतफेड केली पाहिजे. वाढदिवस, रक्षाबंधनसारखे कार्यक्रम आपण वृक्षारोपण करून साजरे करावेत, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी या वेळी नागरिकांना केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT