Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Krushi Bhavan : पाच कृषी भवनांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

Approval to construct Krishi Bhawan : तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर एकाच ठिकाणी ‘कृषी’ची सर्व कार्यालये यावीत, यासाठी राज्य शासनाने कृषी भवन उभारण्यास मंजुरी दिली आहे.

Nashik News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाची सर्व कार्यालये एका छताखाली उपलब्ध व्हावीत, हे शेतकऱ्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर एकाच ठिकाणी ‘कृषी’ची सर्व कार्यालये यावीत, यासाठी राज्य शासनाने कृषी भवन उभारण्यास मंजुरी दिली आहे. इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, येवला आणि चांदवड या पाच ठिकाणी तालुका स्तरावर कृषी भवन उभारण्यात येणार आहे.

पाचही तालुक्यांच्या कृषी भवनांसाठीचा निधी मंजूर करून घेतला असून, तो तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे. नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या शिंगाडा तलाव परिसरात कृषी अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू आहे.

Agriculture Department
Beed Krushi Bhavan : बीड येथे कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

यामुळे कृषी विभागाचे तालुका, उपविभागीय, अधीक्षक व विभागीय सहसंचालक कार्यालये आता एकाच आवारात असणार आहेत. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या बीजनियंत्रण, खतनियंत्रण, कीडनाशक, कीटकनाशके प्रयोगशाळाही एकाच परिसरात असाव्यात, यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मुख्यालयातील खत चाचणी प्रयोगशाळा, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, मृद चाचणी प्रयोगशाळा व कीटकनाशके अंश तपासणी प्रयोगशाळा यांच्या इमारतीसाठी कृषी विभागाने १४.८२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Agriculture Department
Grampanchayat Bhavan : सहा वर्षांनंतर मिळाली प्रशासकीय मान्यता

येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुक्यातील तीन मंडळ कृषी अधिकारी कार्यालये व फळ रोपवाटिका, कृषी भवन इमारत बांधण्यासाठी १३.८५ कोटींच्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चार मंडळ कृषी अधिकारी कार्यालये व तालुका फळ रोपवाटिका यासाठी ६.५२ कोटींच्या निधीला मान्यता मिळालेली आहे.

चांदवड तालुका कृषी अधिकारी कार्यालय इमारत व तालुक्यातील वडाळीभोई, दुगाव व चांदवड येथील मंडळ अधिकारी कार्यालय, तसेच कृषी भवन उभारण्यासाठी १४.६७ कोटी रुपये निधी मिळाला आहे. त्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. दिंडोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वणी, उमराळे व दिंडोरी येथील मंडळ अधिकारी कार्यालये बांधण्यासाठी दहा कोटींच्या, तसेच इगतपुरी येथे कृषी भवन इमारत बांधण्यासाठी दहा कोटी रुपये रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com