MPSC Exam Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam : संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांना स्थान नाहीच; कृषी पदवीधरांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (ता. २५) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात मंगळवारी (ता.२०) रात्री कृषी पदवीधरांनी पुण्यातील लाल बहादूरशास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली. मात्र कृषी पदवीधरांची मागणी आयोगाने फेटाळत सद्यस्थितीत या परीक्षेची पूर्व तयारी झाली असून कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांसह स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित परीक्षेत कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट -अ आणि गट -ब मधील २५८ पदांचा समावेश करून जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. तसेच या पदांची भरती याच संयुक्त पूर्व परीक्षेतून घेण्यात यावी अशीही मागणी कृषी पदवीधरांनी केली होती. तर याआधी देखील कृषी पदवीधरांनी कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात यावा यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.

पण आयोगाने कृषी सेवेतील पदांचा विचार न केल्याने रस्त्यावर शेकडो स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी उतरले. त्यांनी अचानक आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याच्या सुचना स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थ्यांना करताना कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले. रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.

कृषी विभागामार्फत आयोगाला पत्र

दरम्यान याचमुद्द्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली बाजू मांडत या मागणीला पाठिंबा दिला होता. तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील याबाबत भूमिका मांडली होती. महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण २५८ पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. पण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या सर्व प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

आयोगाचे स्पष्टीकरण

सदर परीक्षेसंदर्भात दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्यानेच कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. तर सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली असल्यानेच या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नाही असे आयोगाने म्हटले आहे. तर महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरतीप्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT