Nashik News: मका व कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येवला रस्त्यावर रास्ता रोको करीत शासनाचे लक्ष वेधले..सद्यःस्थितीत कांदा व मक्याला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडून कांद्याला अनुदान जाहीर करावे तसेच शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत येवला-नांदगाव महामार्ग काही काळ अडविला..Nandgaon APMC : नांदगाव येथे चार हेक्टरवर उभारणार मार्केट यार्ड.आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत आंदोलन स्थगित करण्यात आले. निवेदनात मक्याला अनुदान देण्याबरोबरच कांद्यावरील निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी बाजारभाव घसरल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे..मका हमीभावापेक्षा कमी दराने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नाही. तसेच कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात शुल्कामुळे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे..शासनाने तातडीने अनुदान जाहीर करून निर्यात शुल्क हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.या आंदोलनात निलेश चव्हाण विशाल वडगुले दत्तात्रय जाधव पवन सूर्यवंशी ज्ञानेश्वर निकम व तालुक्यातील शेतकरीउपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.