Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणार

Water Scheme : तालुक्यातील १०२ गावांतील योजना अपूर्ण आहेत. यासंदर्भात ३ मे रोजी ‘डहाणूत ‘जलजीवन’ची रखडपट्टी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.

Team Agrowon

Kasa News : डहाणू तालुक्याच्या अनेक गावांत जलजीवन योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरापासून काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांनी दिली.

तालुक्यातील १०२ गावांतील योजना अपूर्ण आहेत. यासंदर्भात ३ मे रोजी ‘डहाणूत ‘जलजीवन’ची रखडपट्टी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली.

डहाणू तालुक्याच्या जंगलपट्टी, तसेच बंदरपट्टी भागातील अनेक गाव-पाड्यांत मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकण्याची वेळ येते; परंतु जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेची तालुक्यात काही ठिकाणी अंमलबजावणी झाल्याने काही आदिवासी भागांत सुविधा झाली.

तरी अनेक गावांत काही कंत्राटदार काम करत नसल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. डहाणूच्या काही गावांत नळाद्वारे लोकांना पाणी मिळू लागले; परंतु वर्षभरापासून काही कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

अधिकाऱ्यांकडून आढावा

‘जलजीवन’च्या कामांची पाहणी करत गंगाधर निवडंगे यांनी आढावा घेतला. त्यांनी विविध पाणीपुरवठ्याच्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या वेळी चळनी, गोरवाडी, तवा येथील काम बंद असल्याने कंत्राटदारांवर कारवाई करण्याची शिफारस केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT