Strawberry Cluster Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Cluster : भीमाशंकरला साकारतेय स्ट्रॉबेरी क्लस्टर

Agriculture Development : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात गुलाबी क्रांती येणार आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात गुलाबी क्रांती येणार आहे. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून स्ट्रॉबेरी सारख्या नगदी पिकातून शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. यासाठी आदिवासी उपाययोजने अंतर्गत २५८ शेतकऱ्यांना १ कोटी २० लाख ७४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी प्रकल्प राबविण्यासाठीचा प्रस्ताव नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयास दिला होता. त्यामध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगांव अंतर्गत (ता. आंबेगाव, जि. पुणे) अनुसूचित जमातीच्या एकूण २५८ लाभार्थी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकांच्या लागवडीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलावर आदिवासी आयुक्त शासनास अहवाल सादर करणार आहेत.

पाच गुंठे जागेच्या प्रकल्पात स्ट्रॉबेरीची रोपे, लागवड साहित्य, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आदी साहित्य शेतकऱ्यांना योजनेतून देण्यात येईल. त्यासाठीचे मार्गदर्शनही कृषी विभागाकडून वेळोवेळी करण्यात येणार आहे. तर प्रति लाभार्थी शेतकऱ्याचा खर्च ४६ हजार ८०० रुपये आहे. तसेच खर्चामध्ये प्रति लाभार्थी सहभाग एकूण प्रकल्पाच्या १५ टक्क्यांप्रमाणे १८ लाख ११ हजार १६० रुपये आहे

मी कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून गेली तीन वर्षे स्‍ट्रॉबेरीचे पीक घेत आहे. पहिले दोन वर्ष ५ गुंठे पीक घेतले होते. यातून मला ८० हजार ते १ लाख रुपये फायदा झाला होता. यावर्षी १२ गुंठे लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार तयारी केली आहे. यावर्षी कृषी विभागाच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
लक्ष्मण मावळे, पाटण, भिमाशंकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हरभरा दरात नरमाई; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत केळीचे दर ?

Maharashtra Election 2024 : बुलडाणा जिल्ह्यात छाननीत १८७ अर्ज वैध; १२ अवैध

Cotton Market : ओलाव्यामुळे कापसाचे कापसाचे भाव कवडीमोल; सीसीआयने खरेदी करण्याची मागणी

Women Voters In Assembly Election : राज्यातील ३८ मतदार संघात ठरणार महिलाच किंगमेकर; पुरूषांपेक्षा महिला मतदारांची सख्यां अधिक

Ujani Dam : उजनी धरणातून शेतीला यंदा गरजेनुसार सुटणार ३ आवर्तने, १११ टीएमसी पाणीसाठी शिल्लक

SCROLL FOR NEXT