Stormy Rain in Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Stormy Rain in Kolhapur : कोल्हापुरला सलग दुसऱ्या दिवशी वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान, घरांची पडझड

Stormy Rain : ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागात झाडांची पडझड झाली तर काही भागात गाराचा पाऊस झाला.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने तडाखा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्व भागाला झोडपून काढलेल्या वळवाचा पावसाने काल मात्र सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दिवसभरातील उकाड्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास अर्ध्या तासाहून अधिकवेळ पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण केला. अचानक सुटलेल्या वाऱ्याने काही भागात झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. शहरासह उपनगरांत वीज पुरवठा खंडित झाला होता.

ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागात झाडांची पडझड झाली तर काही भागात गाराचा पाऊस झाला. मागच्या काही दिवसांत पारा ३८ ते ४१ अंशापर्यंत पोहोचल्याने कोल्हापूरकर उकाड्याने हैराण झाले होते. बुधवारी शिरोळ, जयसिंगपूर भागात वळिवाने झोडपून काढले होते, तर हातकणंगले, करवीर, कागल तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला आहे.

सलग दोन दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. चंदगड, कागल, गडहिंग्लज तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला. मांडेदुर्ग येथे हनुमान विद्यालयासह एका घरावरील छप्पर उडाले. उडालेले छप्पर दुसऱ्या घरावर पडून नुकसान झाले. रामपूर येथे एका घरावर झाड कोसळले. धुमडेवाडी फाट्यानजीक झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली. दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

माणगाव (ता. हातकणंगले) येथे जोरदार वारा व कडाडून विजा झाल्या. वीज टॉवरवर पडल्याने टॉवरने पेट घेतला. यामध्ये ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, साजणी- माणगाव हद्दीनजीक सावळा मळा येथे ओढ्यानजीक पडलेला पालापाचोळा वर वीज पडून पाला पेटला. ही घटना बुधवार सायंकाळी घडली. जोरदार वारा वाहू लागल्याने माणगाव तांदळे जगदाळे मळ्यानजीक विद्युत वाहक तारा एकमेकांस स्पर्श होऊन वीज टॉवरवर पडताच टावरने पेट घेतला.

टॉवरला लागलेली आग पाच दहा फूट उंच होती. शिवाय बारा विद्युत मोटाराची कनेक्शन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने यामध्ये अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. या टॉवरनजीक मोठा ट्रान्स्फर असून या ट्रान्स्फरमध्ये ३०० लिटर डिझेल शिल्लक होते. तो आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असता तर येथे मोठा स्फोट होऊन शेकडो एकर उस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असता. शेतकऱ्यांच्या बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

शिरोळ तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा उदगाव (ता. शिरोळ) गावाला बसला. यात महावितरणचे सुमारे २१ वीज खांब जमीनदोस्त झाले, तर ४० ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. सुमारे २५ हून अधिक घरांची व शेडचे नुकसान झाले असून, ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्याकडून पंचनामे सुरू केले आहेत, तर गावभागातील सुमारे १८ तास विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे उदगाव येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT