Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ‘अवकाळी’ पावसाचा वादळी जोर कायम

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या पाचही जिल्ह्यांत अनेक ठिकाणी बुधवारी (ता. १७) दुपारनंतर व रात्री उशिरा अवकाळी पावसाचा वादळी जोर कायम होता.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या पाचही जिल्ह्यांत अनेक ठिकाणी बुधवारी (ता. १७) दुपारनंतर व रात्री उशिरा अवकाळी पावसाचा वादळी जोर कायम होता. त्यामुळे नुकसानीचे सत्रही कायम असून, काढणी राहिलेल्या रब्बीसह, फळपीक तसेच काही उन्हाळी पिकांनाही या अवकाळी पावसाचा दणका बसत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आडुळ परिसरात बुधवारी (ता. १७) पुन्हा जोरदार वादळी वारा व पाऊस झाला, वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात ब्राह्मणगाव, आडुळ, जामवाडी तांडा, देवगावसह परिसरांतील अनेक फळबागा, आंब्याची झाडे तुटली, तर अनेक घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले.

अंतरवाली खांडी येथे शेडचे पत्रे अंगावर पडल्याने एक शेळी दगावली, तर अन्य तीन शेळ्या जखमी झाल्या. जालना जिल्ह्यातील गोंदी परिसरात वादळी वारे व गारासह जोरदार पाऊस झाला. टरबूज, उन्हाळी बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. विजेचा कडकडाट मोठा होता. अंबड शहरासह परिसरात पाऊस झाला.

या वेळी नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुखापुरीत अवकाळी पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोराचे वारे व मेघगर्जनेसह झालेल्या पावसात झाडे उन्मळून पडली. पाऊस झालाबीड तालुक्यातील पांढऱ्याची वाडी येथे वीज पडून चार जनावरे दगावले.

परिसरातील भवानवाडीत जोरदार पावसाने ओढ्याला पूर आला. नेकनूर परिसरातही वादळामुळे अनेक घरावरील तीन पत्रे उडाली. आंबा पिकाचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. परांड्यातील देऊळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडाली. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील देवणी, बेलकुंड तसेच निलंग्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT