Weather Update
Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Stormy Weather : बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली

Team Agrowon

Pune News : कमी दाब प्रणालीची तीव्रता वाढल्याने बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. आज (ता. २६) या प्रणालीचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. मध्यरात्रीनंतर ही प्रणाली सागर बेट आणि आणि खेपूपारा दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्याची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) वादळी प्रणाली तयार झाली. ही प्रणाली सकाळी बांगलादेशच्या खापूपारापासून ४४० किलोमीटर, पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासून ४४० किलोमीटर दक्षिणेकडे होती. शनिवारी (ता. २५) सायंकाळपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात रुपांतरण होणार आहे.

आज (ता. २६) ही वादळी प्रणाली बांग्लादेश, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पोचणार आहे. मध्य रात्री ताशी ११० ते १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह ही प्रणाली सागर बेट आणि खेपूपारा दरम्यान जमिनीवर येण्याचा इशारा आहे. या वेळी पश्चिम बंगाल, ओडिशा, बांग्लादेशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान समुद्र खवळणार असून ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या किनाऱ्यालगत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उपसागरात मॉन्सूनची प्रगती

वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल सुरू ठेवली आहे. शनिवारी (ता. २५) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पुढील वाटचालीस प्रगतीस पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : लसणाचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत गवार दर?

Heavy Rain : खानदेशात तीन दिवसांत अनेक भागांत पाऊस

Monsoon Rain : विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज; राज्यभरात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता

Banegaon Water Project : बाणेगाव प्रकल्पाच्या कालव्यांची दुरुस्ती कधी?

Agriculture Sowing : बीडमध्ये ७८ टक्के पेरणी आटोपली

SCROLL FOR NEXT