Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain : समुद्रात वादळस्थिती कायम; सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

Rain Alert : जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी, तर काही भागात हलक्या सरी सुरू आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ या चक्रीवादळामुळे समुद्रात वादळस्थिती कायम आहे. कोकण किनारपट्टीला ताशी ३५ ते ४० किमी वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी, तर काही भागात हलक्या सरी सुरू आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. वादळामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. मच्छीमारांनी नौका देवगड बंदराला आश्रयाला आल्या आहेत.

कोकण किनारपट्टीला सध्या ताशी ३५ ते ४० किमी वेगाने वारे वाहत आहेत. १ ऑगस्टपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र ही स्थिती समुद्रकिनारीच राहणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागात जोरदार सरी तर काही भागांत हलक्या सरी सुरू आहे. कोकण किनारपट्टीला देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गात २ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT