Prakash solanke house Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरावर दगडफेक ; पेटवल्या गाड्या

Attack on NCP MLA : बीड जिल्ह्यातील माझलगावमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच पार्किंगमधील गाड्या पेटवण्यात आल्या.

Swapnil Shinde

Maratha protestors Aggressive : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, मराठवाड्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी साखळी उपोषण आणि मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी बीड जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाले. माजलगावमध्ये मोर्चा सुरू असताना काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा आणि गाड्या जाळ्यात आल्या. यावेळी आमदार सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरामध्येच होते. त्यात कोणत्याही स्वरुपाची दुखापत झाले नाही.

आंदोलकांनी बीड-परळी महामार्ग ठिय्या मांडला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच काल पासून जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी बसवर दगडफेकीच्या घटना घडली. तर बीडच्या आष्टीत तहसीलदाराची गाडी अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT