Krishi Seva Kendra Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Seva Kendra : निविष्ठा खरेदी उद्यापासून बंद ; पाच डिसेंबरपासून निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यव्यापी संप

Team Agrowon

Pune News : निविष्ठांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेले प्रस्तावित निविष्ठा कायदे कायमचे मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व निविष्ठा विक्रेते पुढील महिन्यात बेमुदत बंद पुकारणार आहेत. बंदच्या तयारीचा भाग म्हणून उद्यापासून (ता. २०) निविष्ठांची खरेदी थांबविली जाणार आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स , सीडस् डीलर्स असोसिएशनने (माफदा) राज्यातील सर्व जिल्हास्तरीय निविष्ठा विक्रेते संघटनांना पत्रे पाठविली आहेत. “दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान आपण राज्यव्यापी बंद करूनदेखील सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे पाच डिसेंबरपासून निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवायची आहेत. या तयारीचा भाग म्हणून २० नोव्हेंबरपासून राज्यातील कोणत्याही विक्रेत्याने कोणत्याही कृषी निविष्ठांची खरेदी करू नये,” असे या पत्रात नमुद करण्यात आलेले आहे.

बेमुदत बंदबाबत प्रत्येक निविष्ठा केंद्रचालकाने दर्शनी भागात फलक लावावेत. शेतकऱ्यांच्या विरोधात विक्रेते नसून अन्यायकारक कायदे हटविण्याच्या मागणीसाठी विक्री केंद्रे बंद ठेवली जात असल्याची माहिती केंद्रचालकाने शेतकऱ्यांना द्यावी, अशी सूचना ‘माफदा’ने केलेली आहे.

पाच डिसेंबरपासून बेमुदत बंद सुरु झाल्यानंतर सात डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला सर्व विक्रेते धडकणार आहेत. विधिमंडळासमोर आंदोलन केले जाईल. यात प्रत्येक जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्तीने उपस्थित राहावे, असेही ‘माफदा’ने सुचविले आहे.

‘...तोपर्यंत हटणार नाही’

‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील म्हणाले, ‘‘ राज्यातील ७० निविष्ठा विक्रेते एकप्रकारे राज्याच्या कृषी व्यवस्थेला बळकटी आणत आहेत. शेतकऱ्यांना निविष्ठांचा पुरवठा व त्याचबरोबर सल्ला सेवा देण्याचे काम विक्रेते करतात. त्यांना गुन्हेगार समजून कैदेत टाकण्यासाठी नवे कायदे आणणे गैर आहे. शासनाकडून प्रस्तावित कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही.’’

विक्री परवाने परत करणार

नवे कायदे आणून निविष्ठा विक्रेत्यांचा छळ केला जाणार आहे. त्यामुळे सर्व विक्रेते आपापला परवाना कृषी विभागाला परत करणार आहेत. त्यासाठी परवान्याची प्रत आधी ‘माफदा’कडून तालुका पातळीवर गोळा केली जाईल. तालुक्याकडून या प्रति जिल्हा संघटनेकडे पाठविल्या जातील. सर्वानुमते निर्णय झाल्यानंतर परवाने परत केले जातील, असे ‘माफदा’चे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT