Jalna Railway Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Railway : खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्याने वाटा उचलावा

बुलडाणा : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जालना ते खामगाव रेल्वे मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाने आपला वाटा उचलावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जालना ते खामगाव रेल्वे मार्ग (Jalna Khamgaon Railway) उभारण्यासाठी राज्य शासनाने आपला वाटा उचलावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. जाधव यांनी शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.

जिल्हा विकासाच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल. केंद्राच्या २०१६ च्या अर्थसंकल्पामध्ये पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत खामगाव जालना रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली. मे २०२२ मध्ये या रेल्वेमार्गचे हवाई सर्वेक्षण

रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण झाले असून आता जागा उपलब्धता व भूमी अधिग्रहणसंदर्भात पुढील कारवाई अधिक गतीने करावी. या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के वाटा हा राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. राज्य शासनाने या रेल्वे मार्गासाठीचा आपला वाटा दिला तर खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचे काम तत्काळ सुरू होईल. तसेच अकोला-अकोट-खंडवा हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यामधून जाणार आहे.

या मार्गालाही केंद्र सरकारने मंजुरात दिली असून राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून द्यावी व भूमी अधिकरणाची कारवाई पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा या नदीजोड प्रकल्पासाठीचे वैनगंगा ते नळगंगा या प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. परंतु खामगाव ते पेनटाकळी हे साधारण ४७ किलोमीटरचे सर्वेक्षण होणे अजून बाकी आहे. ते सर्वेक्षण तत्काळ करून प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात निधी उपलब्ध करून द्यावा, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmers: सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा 

Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर

MSP Procurement: हमीभावाने १५ पासून खरेदी

Space Farming: चंद्रावरही शेती शक्य होणार; नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग सुरु

Tractor Emission Norms: ‘ट्रेम ५’ मुळे ट्रॅक्टर होतील अधिक पर्यावरणपूरक

SCROLL FOR NEXT