Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई; अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar On Milk Adulteration : राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूध भेसळीवरून वक्तव्य केलं आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा केला जाणार असून दूध भेसळ करणाऱ्यांवर मोका लावला जाईल, असे संकेत दिले आहेत. पवार म्हणाले, "राज्यात दुधात भेसळ होत आहे. दूध भेसळी विरोधात कडक कायदा केला जावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यावरून आम्ही दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे." असंही पवार म्हणाले. बारामतीमध्ये रविवारी (ता.४) अजित पवार बोलत होते. 

पुढे पवार म्हणेल,  "दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे केली होती. मात्र राष्ट्रपतींनी आमची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार दूध भेसळ करणाऱ्यांवर मोका लावणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी सरकारने दुधाला ५ रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचेही अजित पवार म्हणाले.

तसेच अजित पवार यांनी सध्याच्या राजकारण आणि टीका टिप्पणीवर भाष्य करताना, मी फक्त राज्याच्या विकासावर बोलतो. कोण कोणाला काय म्हणतं याकडे बघत नाही. कोण कोणाला ढेकूण म्हणत. आता तर फक्त एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवले आहेत. यामुळे विकासाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही अजित पवार यांनी सांगितलं. 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतंत्र कायदा करण्याचे ठरवल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. तसेच राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवावी. दोषींवर कडक कारवाई करावी, असेही निर्देश शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ होत आहे. यावरून भेसळकरणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT