Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : महायुती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल : नाना पटोले

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातल विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम बुधवारी (ता.१५) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानंतर आता विरोधकांनी महायुती सरकारवर निशाना साधण्यास सुरूवात केली आहे. प्रचाराच्या तोफा डागण्याआधीच आरोपांच्या फैरी आता झाडल्या जात आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुतीवर निशाना साधत जोरदार टीका केली आहे. पटोले यांनी, महाराष्ट्र खोके सरकारमुळे मागे गेला असून येथे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल झाले. पण शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले यांनी, राज्यातील महायुती सरकार हे कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने घेतलेली पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व मुद्दे खोटे आणि बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला. फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली हे उघड सत्य आहे. पण काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची गुजरातच्या हस्तकांनी मागील दोन वर्षात पुरती वाट लावली, अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली आहे.

पुढे पटोले म्हणाले की, या सरकारने दोन वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले. मोदी शाह यांच्यासाठी आपला महाराष्ट्र फक्त एटीएम असून राज्यातले प्रस्तावित मोठे प्रकल्प गुजरातने पळवले. मात्र शिंदे, फडणवीस व अजित पवार मूग मिळून गप्प बसले. फडणवीसांनी तर गुजरातमधील गुंतवणुकीला समर्थन दिले. राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज बनली आहे. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केल्याचा दावा पटोले यांनी यावेळी केला.

तर मुंबईतील महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून कंत्राटदारांचे भले केले. मलई खाण्याचे काम गेल्या दोन वर्षात बिनबोभाटपणे सुरु असल्याचा आरोप देखील पटोले यांनी यावेळी केला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना, शिंदे यांनी रिपोर्टकार्ड वर बोलणे हास्यास्पद असून त्यांनी रेटकार्ड वर बोलले पाहिजे असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

२०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारीचा सामना करावा लागला, त्या संकटातही महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची दखल देशानेच नाही तर जगाने घेतली. गुजरात, उत्तर प्रदेशात या भाजप शासित राज्यात मृतदेहांचे ढिग लागले होते. त्यामुळे युती सरकारने पाठ थोपटून घेऊ नये. त्यांची कामगिरी व ओळख फक्त ‘गद्दारी’ व ‘खोके सरकार’ एवढीच आहे.

राज्यात राज्यात अशांतता पसरली असून आरक्षणाच्या नावावर जाती जातीत भांडणे लावली जात आहेत. कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावला असून जंगलराज झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत, शाळेत मुली सुरक्षित नाही व सत्ताधारी पक्षाचे नेतेही देखील सुरक्षित नाहीत. महागाई व बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारी भरती निघत नाही निघाली तर प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटतात, तरुणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे एका पिढीचे भविष्य बरबाद करण्याचे काम युती सरकारने केल्याचे पटोले म्हणाले.

तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपले मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाही, असे राज्य सरकार चालवू अशी प्रतिज्ञा घेतली होती. मात्र शेतकरी आत्महत्या या सरकारला रोखता आलेल्या नाहीत. भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम या सरकारने केले असून राज्यावर ९ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. यामुळे महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, महाभ्रष्ट युतीला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

State Agriculture Corporation Land : वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली? शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन शिर्डी संस्थानला मोफत

Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

BJP Candidate List : महायुतीच्या जागा वाटपाच्या रस्सीखेचात भाजपची बाजी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT