APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Evaluation : राज्यातील बाजार समित्यांचे मूल्यमापन ‘पणन’कडून जाहीर

Evaluation of market committees : राज्यातील बाजार समित्यांच्या २०२३-२४ या वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन पणन संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अनुक्रमे हिंगणघाट, कारंजालाड आणि बारामतीचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे.

Ganesh Kore

Pune News : राज्यातील बाजार समित्यांच्या २०२३-२४ या वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन पणन संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अनुक्रमे हिंगणघाट, कारंजालाड आणि बारामतीचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे. तर खासगीमध्ये कॉटनसिटी (यवतमाळ), किसान मार्केट (पुसद) आणि परफेक्ट (नाशिक) या बाजार समित्यांचा समावेश आहे, अशी माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी दिली.

दरम्यान, पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, या मोठ्या आणि महत्त्वाच्या बाजार समित्यांना स्थान मिळाले नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजावर वार्षिक मूल्यमापन केले जाते.

हे मूल्यमापन करताना, बाजार समित्यांमधील विक्री व्यवस्था, पायाभूत सुविधा, आर्थिक नियोजन, शासकीय योजना आणि उपक्रम राबविणे आदी विविध ३५ निकषांवर २०० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. तर खासगी बाजार समित्यांसाठी ४० निकष आणि २५० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यपातळी असे स्तर ठरविण्यात आले होते. विविध स्तरांवर झालेल्या मूल्यमापनानंतर अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.

प्रथम १२ बाजार समित्या आणि मिळालेले गुण
बाजार समिती ---- जिल्हा ---- गुण
हिंगणघाट ---- वर्धा ---- १७८
कारंजा लाड --- वाशीम --- १७१.५
बारामती --- पुणे ---- १६५
लासलगाव --- नाशिक --- १६५
पंढरपूर --- सोलापूर --- १५५.५
चांदूर बाजार ---- अमरावती --- १५५.५
अकोला --- अकोला --- १५४.५
उमरेड --- नागपूर --- १५२.५
अकलूज --- सोलापूर --- १४९
मंगळूरपीर ---- वाशीम --- १४९
लातूर --- लातूर --- १४८.५
संगमनेर --- अहिल्यानगर ---- १४८

खासगी बाजार समित्या कॉटनसिटी (भोयर, जि. यवतमाळ) --- १७५.५ किसान मार्केट (शेलू, यवतमाळ) --- १५४.५ परफेक्ट कृषी (नांदूर, नाशिक) --- १४६.५ ंरंगराव पाटील (उदगीर, लातूर) --- १४२.५ श्री गजानन (पळसगाव, जि. हिंगोली) --- १४१.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT