APMC Election : सोलापूर, बार्शी बाजार समित्यांसाठी मागितली अर्हता तारीख

APMC Election In Solapur : लोकसभा निवडणुकीतील रणधुमाळीचा निकाल समोर येण्यापूर्वीच जिल्ह्यातील सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
APMC Election
APMC ElectionAgrowon

Solapur News : लोकसभा निवडणुकीतील रणधुमाळीचा निकाल समोर येण्यापूर्वीच जिल्ह्यातील सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

या दोन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी मतदानाची अर्हता तारीख काय असावी? अशी विचारणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे. प्राधिकरणाकडून अर्हता तारीख आल्यानंतर या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे.

APMC Election
Pune APMC : बनावट पावती पुस्तकाद्वारे लाखो रुपयांची लुट

सोलापूर बाजार समितीवर माजीमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे वर्चस्व आहे. बार्शी बाजार समितीवर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही बाजार समित्यांमधील संचालक मंडळाची मुदत साधारणतः एक वर्षापूर्वीच संपली आहे. महाराष्ट्र पणन कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार या दोन्ही बाजार समित्यांना सहा-सहा महिन्यांची दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे.

पणन कायद्यातील तरतुदीनुसार बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला फक्त एक वर्षाचीच मुदतवाढ देता येते. एक वर्षाची मुदतवाढ संपल्यानंतर प्रशासक किंवा निवडणूक हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.

सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मिळालेली मुदतवाढ १४ जुलै २०२४ रोजी तर बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मिळालेली मुदतवाढ २३ जुलै २०२४ रोजी पूर्ण होत आहे.

सध्याच्या संचालक मंडळाकडे साधारणतः महिना ते दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत प्राधिकरणाकडून अर्हता तारीख प्राप्त झाल्यास मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू होऊ शकतो.

APMC Election
APMC Levy : बाजार समितीबाहेरील केळी खरेदीवर शुल्क आकारणी

निवडणुकांसाठी वाट बिकट

पावसाळ्यात निवडणुका घेऊ नयेत, याबाबत प्राधिकरण व सहकार विभागाने यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असल्याने दरम्यानच्या काळात मतदार याद्या जरी अंतिम झाल्या तरीही प्रत्यक्ष निवडणुकीची वाट बिकटच आहे.

नोव्हेंबरपासून या निवडणुकांना सुरुवात होऊ शकते. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांचा निकाल, नवीन सरकारची स्थापना, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विस्तार या घटना-घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने त्या धामधुमीत बाजार समित्यांच्या निवडणुकांना किती महत्त्व दिले जाईल? यावर बाजार समित्यांच्या निवडणुकीची वाट अवलंबून असणार आहे.

मुदतवाढ संपलेल्या या दोन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक वेळेत व्हावी, यासाठी आम्ही तयारी केली आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेला मतदानाच्या अर्हता तारखेची माहिती आम्ही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून मागितली आहे. त्यांच्याकडून ही तारीख मिळाल्यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com