Mhaisal Water Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

MLA VikramSingh Sawant : जतच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम तातडीने मार्गी लावा. येथील जनतेला लवकरच न्याय देता येईल, या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटेल,

Team Agrowon

Sangli News : जतच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम तातडीने मार्गी लावा. येथील जनतेला लवकरच न्याय देता येईल, या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना कामासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या. बैठकीला विस्तारित म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपअधीक्षक जाधव, गडदे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी खरात, कांबळे, घाटगे यांच्यासह आदी उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीनंतर आमदार सावंत यांनी अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली. येळदरी या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली.

तसेच येळदरी व बेळुंखी या भागातील कामाची पाहणी करून तातडीने मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश यावेळी दिले. तसेच जत तालुक्यातील गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे असा आदेश म्हैसाळ योजनेतील सर्व अधिकाऱ्यांना दिले.

यंदा मोठा दुष्काळ आहे. पाण्याचे नियोजन तातडीने करावे, किमान ४०० क्युसेकने जत तालुक्याला पाणी द्यावे, विस्तारित योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अंतिम सर्व्हे अहवाल पंधरा दिवसात सादर करून तो जनतेच्या समोर ठेवला जावा. ही योजना शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

शासन पातळीवर कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. सावंत त्यांनी दिली. या वेळी सरपंच राम सरगर, धानम्मा देवी दूध संघाचे संचालक, रावसाहेब मंगसुळे, जे. के माळी, बाबासाहेब माळी, महादेव पाटील, यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

SCROLL FOR NEXT