Soybean Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : किमान आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी सुरू करा

Team Agrowon

Akola News : सोयाबीनच्या उत्पन्नात झालेली घट, सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असलेले सोयाबीनचे बाजारभाव आणि शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू करावी अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवून तत्काळ मान्यता देण्याची शिफारस केंद्र शासनास करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत आमदार सावरकर यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. जिल्ह्यातील सोयाबीनची लागवड होते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला.

कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले. याबाबत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली होती.

पाहणीअंती सोयाबीन पीक पिवळे पडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, पावसाचा खंड पडणे आणि जमिनीचे तापमान ३१ ते ३२ अंशापर्यंत पोहोचणे होते. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. सोयाबीनसाठी ४६०० रुपये किमान आधारभूत मूल्य निश्चित केले आहे.

मात्र, सद्यःस्थितीमध्ये बाजारात किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी, कमी उत्पन्न आणि कमी बाजारभाव अशा दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी योजना सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

SCROLL FOR NEXT