Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना सुरुवात

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी ५ हजार ९०३ हेक्टर म्हणजेच २१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकाच्या पेरणीकडे वळू लागले आहेत. परिणामी विभागात उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी कमी चांगला पाऊस झाला होता तरी काही भागात पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे.

त्यामुळे गेल्या महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली असली पुढील दोन ते तीन महिन्यांत पाणीटंचाई काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसू शकतो अंदाज आहे. उन्हाळी मक्याची १७६८, बाजरी १६९९, उन्हाळी मूग १०, उडीद ९, भुईमूग २३०१, उन्हाळी सूर्यफूल १, सोयाबीन ७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सध्या विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पीक काढणीस आले आहे. ज्वारी पिके काढणी वेगाने सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकाची पेरणी सुरू झाली आहे.

काही ठिकाणी बाजरी, भुईमूग पिके उगवून आली आहेत. सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील गहू पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. ज्वारी पीक दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती चांगली आहे. हरभरा पीक दाणे भरणे ते पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके उगवून आली आहेत.

जिल्हानिहाय झालेल्या पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के

नगर --- ८८८६ --- ३६६५ --- ४१

पुणे --- ११,०९४ --- २१४२--- १९

सोलापूर --- ७६४५ --- ९७ -- १

एकूण --- २७,६२५ --- ५९०३--- २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT