POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

Pocra Scheme : ‘पोकरा’प्रकरणी तारांकित प्रश्‍न

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani yojana : नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून शेतकरी गट, कंपन्यांना वितरित झालेले साहित्य, अवजारे गायब झाल्याचे प्रकरण अकोला जिल्ह्यात गाजते आहे.

Team Agrowon

Akola News : नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून शेतकरी गट, कंपन्यांना वितरित झालेले साहित्य, अवजारे गायब झाल्याचे प्रकरण अकोला जिल्ह्यात गाजते आहे. सुमारे तीन कोटी ६३ लाख रुपये किमतीची ही अवजारे चौकशीदरम्यान आढळून न आल्याने संबंधितांना यापूर्वीच नोटीस बजावून उत्तरे घेण्याची प्रक्रिया यंत्रणास्तरावर सुरू आहे. आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहता बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर आमदारांनी तारांकित प्रश्‍न केला आहे. त्यानुसार अवर सचिवांनी प्रकल्प संचालकांकडून माहिती मागविली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकरी गटांना मिळालेली अवजारे चौकशी समितीला आढळून न आल्याचे निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय? असल्यास पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या अकोल्याशिवाय इतर १५ जिल्ह्यांत किती ठिकाणी असे प्रकार समोर आले. ज्या गटांकडे अवजारे आढळून आलेली नाहीत, त्यांच्याकडून अवजारे खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम वसूल करण्याबाबत तसेच या सर्व प्रकरणांमध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली. विलंबाची कारणे काय आहेत, अशा विविध प्रश्‍नांची माहिती मागविण्यात आल्याचे समजते.

बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राजेश एकडे, संजय जगताप, शिरीष चौधरी, प्रतिभा धानोरकर आदी आमदारांनी या विषयाकडे लक्ष दिले आहे. या प्रकल्पाच्या अनुदान वितरणात चौकशी पथकांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले. त्यानुसार ११६ गटांना नोटिसाही देण्यात आल्या. आता या नोटीस बजावत उत्तर मागविले जात आहे. मात्र या काळात काहींनी साहित्याची जुळवाजुळव केल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT