Agricultural Sanjeevani Project  Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Project : वर्ल्ड बॅंकेच्या पथकाने जाणल्या पोकरा भागधारकांच्या अपेक्षा

Agricultural Sanjeevani Project : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता.२४) जागतिक बॅंक तसेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे समन्वयक त्यासोबतच पोकरा प्रकल्प संचालक परिमल सिंह यांच्या उपस्थितीत प्रकल्पात समावेशित घटकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला पूरक शेती प्रकल्प राबविण्यावर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गंत खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये विविध उपचारांवर भर देण्यात आला. जून २०२४ अखेर पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पाशी संबंधित शेतकरी व विविध घटकांशी संवाद साधत त्यांना अपेक्षित उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, वनामती संचालक डॉ. मिताली सेठी, जागतिक बॅंकेचे टास्क टिम लिडर रंजन समंतराय, कृषी तज्ज्ञ सौम्या श्रीवास्तव,

आर्थिक सल्लागार तनुजा माथुर, वातावरण अभ्यासक वनिथा कौम्यु, अर्थशास्त्रज्ञ मानसी विद्यासागर फडके, प्रकल्प समन्वयक गीता ॲलेक्‍स, विकास कानुनगो, जमीन आरोग्य तज्ज्ञ विजय कोळेकर, कृषी अभियांत्रिकी शाखेचे सागर खटकाळे, डॉ. राजुल पंत, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, अर्चना कडू यांचा पथकात समावेश होता.

पथकाने केंद्रिय कापूस संशोधन संस्थेला भेट दिली. या वेळी संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी जागतिक आणि भारतीयस्तरावरील कापसाची उत्पादकता, भारतात कापूस उत्पादकता वाढीसाठी अपेक्षित तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ. मणिकंदन यांनी बायोचार निर्मितीविषयक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले.

जमीन आरोग्य जपण्यासाठी बायोचारचे महत्त्वही त्यांनी सांगितले. शेतातील वेस्ट जळणार नसल्याने त्यातून पर्यावरण संरक्षण होईल. त्यामुळे पोकराच्या दुसऱ्या टप्प्यात बायोचार वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought 2026 : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश

Tur Story: तुरीची गोष्ट

Weather Update : ढगांची गर्दी; पावसात नाही जोर!

Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता

Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?

SCROLL FOR NEXT