Nana Patole suspension Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole suspension : कॉँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन; शेतकऱ्यांच्या अपमानावरून विधानसभेत गोंधळ

Maharashtra Assembly Session 2025 : शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणारे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

Dhananjay Sanap

Nana Patole News : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (ता.१) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केलं. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणारे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

पटोले यांनी अध्यक्षांच्या टेबलजवळ जाऊन कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर पटोले यांनी अध्यक्षांचा अपमान केल्यामुळे माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर सभागृहाच्या कामाकाजात अडथळा निर्माण करत असल्यामुळे अध्यक्षांनी पटोले यांना कारवाई करत एक दिवसासाठी निलंबित केलं. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

निलंबनाच्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सरकारवर टिका केली. "माज आलेल्या भाजप महायुतीच्या सरकारची वास्तविकता आज समोर आली आहे. भाजपचे आमदार आणि कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी समजतात. जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल, त्यांना निलंबित करायचं, आणि जे शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांचा सन्मान करायचा, अशा पद्धतीचं सरकार आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे." असं पटोले म्हणाले.

पुढे पटोले यांनी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी रोज निलंबित केलं तरी चालेल, अशी भूमिका मांडली. "राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, धानाचं बोनस शेतकऱ्यांना दिलं नाही, कर्जमाफीचं आश्वासन दिलं पण अजून कर्जमाफी केली नाही, पीकविमा बंद केला. शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उठवू, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. लोणीकर, कृषिमंत्र्यांवर कारवाई करून मुख्यमंत्री माफी मागत नाही, तोवर आम्ही मागे सरणार नाही." असा इशारा पटोले यांनी दिला.

दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचं अपमान करणारं विधान केल्यामुळे राज्यात सार्वत्रिक संतापाची लाट उसळली होती. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी १ रुपया पीकविमा योजनेवरून १ रुपया भिकारी घेत नसल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरूनच आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या बेताल व्यक्तव्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT