Food Processing Training  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing : साताऱ्यात अन्नप्रक्रिया उद्योजकता प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spices Industry : प्रशिक्षणार्थींना अन्न प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शनाबरोबर प्रात्यक्षिक व फळे, लोणचे, मसाला उद्योगांना जवळून अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून देणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आगळे वेगळे प्रशिक्षण ठरले आहे.

Team Agrowon

Satara News : सकाळ-ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी व देशातील नामांकित सातारा मेगा फूड पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया उद्योजकता या विषयाच्या ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाला येथील सातारा मेगा फूड पार्कमध्ये सुरुवात झाली. राज्यभरातील प्रशिक्षणार्थीं यात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

प्रशिक्षणार्थींना अन्न प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शनाबरोबर प्रात्यक्षिक व फळे, लोणचे, मसाला उद्योगांना जवळून अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून देणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आगळे वेगळे प्रशिक्षण ठरले आहे.

या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले, एसआयआयएलसीचे सहसरव्यस्थापक अमोल बिरारी, बीएसआय ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी के पी राधाकृष्णन, संध्या यादव, रविंद्र पाटील तसेच फूड कॉगनिक चे संचालक गजानन कल्याणे इ. उपस्थित होते.

तीन दिवसीय प्रशिक्षणात अन्न प्रक्रिया उद्योगांतील संधी, त्यात असलेला वाव, आव्हाने व उपाय, विविध अन्न प्रक्रिया उद्योगांची ओळख, सुरूवात कशी व कुठून करावी, आवश्यक उद्योजकता कौशल्ये, स्टार्ट अप स्थापना, आवश्यक परवाने, व्यवसायाचे ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, यंत्रसामग्री, निर्यातीतील संधी, शासकीय योजना व अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बॅंक कर्ज योजना इ.विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शिवाय मसाला, फळ प्रक्रिया, पाणी बॉटल इ. प्रक्रिया उद्योगांना जवळून अभ्यासण्याची संधी तसेच मसाला व स्क्वॅश इ. उत्पादनांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. एसआयआयएलसीचे वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे, कार्यक्रम समन्वयक सायली भांगरे, परवीन खान, सातारा मेगा फूड पार्कचे संदेश पोटेकर, फूड कॉगनिकचे व्यवस्थापक रोहन भोळे यांनी मोलाचे योगदान दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT