Jalgaon News : चिंचोली (ता. जळगाव) येथील ‘मेडिकल हब’चे २५ टक्के पूर्ण काम झाले आहे. राहिलेले काम वर्षभरात पूर्ण होईल. एकाच छताखाली शासकीय एम.बी.बी.एस. (ॲलोपॅथी) कॉलेज, बी. एच. एम. एस. (होमियोपॅथी) कॉलेज, आयुर्वेद कॉलेजसह डेंटल व फिजोओथेरपी मेडिकल अशी पाचही शासकीय कॉलेज, नर्सिंग स्कूल, वसतीगृह चिंचोलीत तयार होणाऱ्या मेडिकल हब मधून सुरू होणार आहे.
सध्या जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोहाडी येथील महिला रुग्णालयात होमीओपॅथी महाविद्यालय, देवकर रुग्णालयात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे कामकाज चालते. पण पुढील वर्षभरात खानदेशातून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जळगावात एकाच छताखाली वैद्यकीय शिक्षणासह पदवी मिळणार आहे.
सर्व शासकीय वैद्यकीय कोर्सेस एकाच चिंचोली येथे मेडिकल हबमध्ये मंजुरीचा मोठा निर्णय झाला. पण दोन वर्षापासून मेडिकल हबचे काम रखडले होते. मात्र आता या कामाला गती मिळून काम २५ टक्के पूर्ण झाले आहे.
शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम कंपन्यांकडून टेंडर मागविले. पाच टेंडरपैकी मे. एच.एस.सी.सी.एल. (नोयडा) या कंपनीने टेंडर सर्वात कमी ३.०१ टक्के ठेवले.
यामुळे या कंपनीस संस्थेस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. शासनाने २४ मार्च २०२१ घेतलेल्या निर्णयानुसार जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय यामध्ये वाढ करण्यात येऊन १५० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व ६५० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.