Dr. Shashikant Ahankari: 'हॅलो मेडिकल फाऊंडेशन'चे डॉ. शशिकांत अहंकारी यांचं दीर्घ आजारानं निधन

Dr. Shashikant Ahankari Passes Away : हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजारानं मंगळवारी (ता.८) निधन झालं.
Dr. Shashikant Ahankari
Dr. Shashikant AhankariAgrowon
Published on
Updated on

Hello Medical Foundation : हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजारानं मंगळवारी (ता.८) निधन झालं. मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. बुधवारी (ता.९) सकाळी अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथे अहंकारी यांनी हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापन केली. हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे.

Dr. Shashikant Ahankari
Nanded Farmer : दीडशे कोटी थकविणाऱ्या कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक

डॉ. शशिकांत अहंकारी यांचं जन्मगाव खुदावाडी आहे. ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी अहंकारी यांनी शहरातील नोकरी सोडली. पत्नी डॉ. शुभांगी यांच्यासह १९९३ साली हॅलो मेडिकलची स्थापन केली. हॅलोमध्ये केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण आदि विषयाचा समावेश होता.

डॉ. अहंकारी यांनी धाराशिव येथेत जानकी हॉस्पिटलची स्थापन केली. त्यातून ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट उभारले. भारत वैद्य नावाची संकल्पना राबवून महिलांना आरोग्य प्रशिक्षण दिलं.

डॉ. अहंकारी यांनी राज्यस्तरीय चार समित्यांचे सदस्य म्हणून काम केलं. तसेच पंधरा आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदांमध्ये सहभाग घेतला. तसेच सर्वोत्तम एनजीओसाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार सन्मानित करण्यात आलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com