Crop Damage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Issue : सोयाबीनची वाढ खुंटली; किडीनेही घेरले

Kharif Season : लातूर जिल्ह्यात सततच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसला असून काही भागात पिकांची वाढ खुंटली तर काही पिकांची नाहक मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यात सततच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसला असून काही भागात पिकांची वाढ खुंटली तर काही पिकांची नाहक मोठी वाढ झाली आहे. काही पिकांना किडी व अळींच्या प्रादुर्भावाने घेरले असून पिकांची परिस्थिती बिकट आहे. या स्थितीत शेतकरी हवालदिल झाली असून पिकांना सावरण्यासाठी तो हतबल झाला आहे.

यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्याही वेळेवर झाल्या. पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, गेल्या महिनाभरापासून ढगाळ वातावरण, अपुरा सूर्यप्रकाश व सततच्या पावसामुळे पिके संकटात सापडली असून काही भागात पिकांची वाढ खुंटली तर काही भागात मोठी वाढ होऊन त्याचा परिणाण सोयाबीनला कमी फुले येण्यात झाला आहे.

पाणी साचत असलेल्या ठिकाणी कापूस व सोयाबीनची वाढ खुंटली आहे. चांगल्या वाढलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात उंट अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, कापूस व मुगावर मावा व तुडतुड्यांचा प्रार्दुभाव झाला असून येलो मोझॅकमुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे. यामुळे सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांत आहे.

पिकांवर फवारणीसाठी महागड्या कीटकनाशकांची खरेदी करण्यापासून त्यांच्या फवारणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हंगाम संपत आल्यानंतर कृषी विभागाने बॅटरीवरील फवारणी यंत्रांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले असून आता महाडीबीटी पोर्टलही हँग होत असल्याने ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांची कसरत होत आहे. या स्थितीत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT