Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed Production : नागालँड राज्यामध्ये करणार सोयाबीन बीजोत्पादन

Soybean Market : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचा ‘फुले किमया’ या वाणाचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन घेतले जाणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचा ‘फुले किमया’ या वाणाचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन घेतले जाणार आहे. राज्यासह देशभरात या वाणाला अधिक मागणी असल्याने विद्यापीठाने नागालॅंड कृषी विद्यापीठाच्या मदतीने हे बीजोत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे.

नागालँड कृषी विद्यापीठाद्वारे आदिवासी उपयोजनेंतर्गत फुले किमया या वाणाच्या बियाणांचे बीजोत्पादनासाठी वाटप होणार असून त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १७.१६ क्विंटल बियाणांचा नागालॅंड कृषी विद्यापीठाला पुरवठा केला आहे.

महाराष्ट्रामधील बहुतांश भागात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. राज्यात १९९०-९१ मध्ये २ लाख हेक्टर क्षेत्र होते. यंदा म्हणजे २०२२-२३ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र ४९.०९ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित व विकसित केलेल्या सोयाबीनच्या फुले किमयाचे १८५०, फुले संगमचे १५७५, फुले दुर्वाचे ५६५ व फुले कल्याणी या सोयाबीनच्या वाणांची शेतकरी लागवड करत आहेत.

यंदा (२०२३) मध्ये खरिपात ५० क्विंटल पैदासकार बियाणे उत्पादित केले आहे. हे बियाणे खरीप २०२४ साठी वेगवेगळ्या शासकीय संस्था (महाबीज, राष्ट्रीय बीज निगम), शेतकरी गट/बीजोत्पादक कंपन्या, खाजगी बीजोत्पादक कंपन्यांना स्रोत बियाणे म्हणून विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बीजोत्पादक साखळीमधून गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. राज्यासह देशभरात सोयाबीन बियाणाला मागणी वाढत आहे.

नागालॅँड कृषी विद्यापीठाला १७ क्विंटल १६ किलो बियाणे दिले आहे. विद्यापीठाच्या कसबे डिग्रस (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने तांबेरा प्रतिकारक्षम असा फुले किमया (केडीएस-७५३) हा वाण संशोधित झाल्यानंतर तो दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी सन २०२० मध्ये शिफारशीत आणि अधिसूचित केला गेला.

हा वाण महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे नागालॅंड वाणाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बीजोत्पादन घेतले जाणार आहे.

‘फुले किमया’ हा सोयाबीनचा चांगला वाण असून त्याला राज्यासह देशभरातून मागणी आहे. त्यामुळे यंदा नागालॅंड राज्यात तेथील कृषी विद्यापीठाच्या मदतीने बीजोत्पादन केले जाणार आहे. त्यातून त्या भागातील शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध होणार आहे.
- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT