Seeds
Seeds agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Seed : बियाण्यांसाठीच्या सोयाबीनचे दर ५ हजारांवर

Team Agrowon

Amravati News : या वर्षीच्या खरीप हंगामातील पहिल्या नगदी सोयाबीन पिकाची बाजारातील आवक वाढली आहे. बियाण्यांसाठी खरेदीदार बाजारात उतरल्याने भाव पाच हजारांवर गेले असून प्लान्टसाठी खरेदी होत असलेल्या सोयाबीनला मात्र हमीभावाच्या तुलनेत कमी दर मिळत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी (ता. २६) येथील बाजार समितीत सोयाबीनला ४२५० ते ४४५० रुपये दर मिळाला व २२ हजार ४८३ पोत्यांची आवक नोंदविली गेली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात पैसे मिळवून देणारे सोयाबीन आता बाजारात आले आहे.

पावसाने उघडीप दिल्याने कापणी जोरावर आहे. वाळलेला सोयाबीन बाजारात येत असला तरी त्यामध्ये ८ ते १२ टक्क्यांच्या जवळपास आर्द्रता असल्याचे खरेदीदारांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या पिवळ्या सोन्यास अद्याप हमीभावापेक्षा अधिक भाव मिळालेला नसून भाव दबावातच आहेत.

हंगामाच्या प्रारंभी बियाण्यांसाठी लागणाऱ्या सोयाबीनची खरेदी अधिक होत असून भावही पाच हजारांवर मिळत आहे. तर प्लान्टसाठी खरेदी होत असलेल्या सोयाबीनला मात्र हमीभावापेक्षाही कमी दर आहेत. बुधवारी येथील बाजार समितीत २२ हजार ८१४ पोत्यांची आवक झाली आहे. खरेदीदारांनी या सोयाबीनला ४३५० ते ४५२१ दर दिला.

तर, दसऱ्यापूर्वी सोमवारी (ता. २३) आलेल्या सोयाबीनला ४४५० ते ४६७७ रुपये दर होता. बियाण्यांसाठीच्या सोयाबीनला ४८०० ते ५१०० रुपये दर खरेदीदारांनी दिला. बियाण्यांसाठीच्या सोयाबीनची आवक नियमित नसल्याचे बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture GST : निविष्ठांवरील ‘जीएसटी’ करा रद्द

Maharashtra Budget Session : सर्वच आघाड्यांवर सामसूम

Udhhav Thackrey : योजनांचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ

Cashew MSP : काजू बी हमीभावासाठी कृषिमंत्र्याची भेट घेणार

Crop Insurance : विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक आता ग्रामपंचायतीत लावणार

SCROLL FOR NEXT