Soybean Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी प्रश्नावर किसान सभा मैदानात ; अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Soybean Market : सोयाबीन खरेदी केंद्र प्रश्नावर किसान सभा मैदानात उतरली आहे. किसान सभेच्यावतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता.१२) जोरदार घोषणाबाजी करून सरकारी धोरणाचा निषेध करून निदर्शने करण्यात आली.

Team Agrowon

Ambajogai News : अंबाजोगाई, जि. बीड : सोयाबीन खरेदी केंद्र प्रश्नावर किसान सभा मैदानात उतरली आहे. किसान सभेच्यावतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता.१२) जोरदार घोषणाबाजी करून सरकारी धोरणाचा निषेध करून निदर्शने करण्यात आली.

किसान सभेच्या माहितीनुसार, सोयाबीन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ४४ हजार ७४४ पैकी फक्त २० हजार ९६९ एवढ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून सरकारने सोयाबीन खरेदी केंद्र बंद केले. जिल्हाभरात सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळ निघण्याची वेळ आली आहे.

सरकारी खरेदी केंद्र बंद असल्याने खासगी व्यापारी सुद्धा खरेदीसाठी धजावत नाहीत. खरेदी केलीच तर हमीभावाच्या तुलनेत अत्यंत कमी किंमतीत म्हणजे साधारण ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासकीय खरेदीची तारीख वाढवण्याची आशा असताना पणन मंत्र्यांनी स्पष्टपणे खरेदीसाठी मुदत वाढ नसल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या संयमावरच घाव घातल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.

उपजिल्हाधिकारी कार्यालयावरील निदर्शनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड.अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड उत्तरेश्वर इंगोले रवींद्र देवरवाडे जगन्नाथ घाळे, सय्यद खुर्शीद आत्माराम पवार, ॲड. शिवाजी कांबळे, राष्ट्रपाल पाटोळे, मुक्तार भाई, व्यंकटेश देशमुख आदी उपस्थित होते.

किसान सभेच्या मागण्या
केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदत वाढ देवून संपूर्ण खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावे. संपूर्ण सोयाबीन किमान हमीभावानेच खरेदी करा अन्यथा भावांतर योजनेअंतर्गत फरकशेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. दोन महिन्यापासून खरेदी करत असलेल्या सोयाबीनचे थकीत बिल तत्काळ देण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT