Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement: बारादाण्याअभावी सोयाबीनची खरेदी बंद

Soybean Market: सोयाबीन खरेदीसाठी मुदत सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनची खेड तालुक्यात बारदाण्याअभावी मुदतीपूर्वीच खरेदी बंद करण्यात आली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: सोयाबीन खरेदीसाठी मुदत सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनची खेड तालुक्यात बारदाण्याअभावी मुदतीपूर्वीच खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या विरोधात संताप व्यक्त करण्यात असून ही खरेदी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

तालुक्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यासाठी सोयाबीन खरेदी केंद्र बाजार समितीजवळ खरेदी विक्री संघ येथे सुरू करण्यात आले होते. परंतु या खरेदीसाठी ३१ जानेवारी ही अंतिम मुदत होती.

त्यानंतर शासनाने त्यात वाढ करून ६ फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती. त्यानुसार खरेदी केंद्रावर बऱ्यापैकी सोयाबीन खरेदी केली आहे. परंतु अजूनही तालुक्यातील ३० ते ४० शेतकरी या खरेदीपासून वंचित राहिले आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांनी केंद्राचे सचिव नाना टाकळकर यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा सर्व माल घ्यावा अशी इच्छा आहे.

परंतु ‘नाफेड’कडून बारदाना मिळत नाही. त्यामुळे ही खरेदी बंद करण्यात आली आहे. आता मुदत संपत आल्यामुळे शेतकरीही अडचणीत येत असून नाफेडने तातडीने बारदाना उपलब्ध करून देऊन ही खरेदी करावी, अशी मागणी आळंदी देवाची येथील तुळशीराम रानवडे यांनी केली आहे.

गावातील सहा ते सात शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नावे नोंदवली आहेत. सध्या आमच्याकडे सहा टन माल आहे. शासनाच्या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यामुळे हा माल पडून राहिला आहे. खरेदी न झाल्यास नुकसान होण्याची भीती आहे. त्यासाठी मुदतवाढ देऊन बारदाना उपलब्ध करून द्यावा.
तुळशीराम रानवडे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Harvesting: कापूस वेचणीसाठी मजूर देता का मजूर

Mumbai Redevelopment: मुंबईकरांना दिलासा! ६०० चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Banana Price Crash: वीस एकर केळीवर फिरविला रोटावेट

Municipal Council Polls: नांदेडमध्ये १२ नगरपरिषदा, एक नगरपंचायत अध्यक्षपदासाठी २१२ अर्ज

Hybrid Banana: जळगावच्या संकरित केळीचे विक्रमी उत्पादन

SCROLL FOR NEXT