Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात

Team Agrowon

Amaravati News : परतीच्या पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने सोयाबीन कापणीला वेग आला आहे. यासोबतच दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनची बाजारातील आवक वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत ४० हजारांच्या जवळपास पोत्यांची आवक झाली आहे.

मात्र या हंगामातही सोयाबीनचे दर दबावातच आहेत. नवीन सोयाबीनला हमीदरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पहिले कॅश क्रॉप सोयाबीन बाजारात येऊ लागला आहे.

गेल्या आठवड्यात शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस धान्य बाजार बंद राहिल्याने सोमवारी (ता.१६) व मंगळवार (ता.१७) या दोन दिवसांत सोयाबीनची बंपर आवक नोंदविण्यात आली.

सोमवारी २१,९५३ व मंगळवारी १७, ०६० अशा एकूण ३९ हजार १३ पोत्यांची आवक झाली. परतीच्या पावसाने सध्या दीर्घ विश्रांती घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस येण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. सोयाबीन कापणीवर आले असून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या कापणीला गती दिली आहे. x

उत्पादनाची सरासरी तुलनेने कमी असली तरी गत हंगामातील अनुभव बघता शेतकऱ्यांनी बाजारातील आवक वाढविली आहे. सोमवारी नवीन सोयाबीनला ४१५० ते ४४०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

तर, मंगळवारी या दरात थोडी सुधारणा होऊन किमान ५० व कमाल दर शंभर रुपयांनी वाढले. सरकारने ४६०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केले असले तरी बाजारात मात्र यंदाही हमीदरापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

गत हंगामात प्रारंभी सोयबीनचे दर पाच हजारावर गेले होते. मात्र नंतर त्यामध्ये मोठी घसरण झाली. ४२०० रुपयांवर किमान दर आलेत. यंदाही तीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज खरेदीदारांनी वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादनाचा खर्च निघणेही कठीण झाला असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT